Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार डायनिंग टेबलवर या गोष्टी चुकूनही ठेवू नका, अन्यथा...

Vastu Tips For Home : आपल्या घरासोबत इतर अनेक गोष्टी आहेत ज्या वास्तूशास्त्रानुसार अधिक महत्त्वाच्या समजल्या जातात. घरातील डायनिंग टेबलवर ठेवलेल्या काही गोष्टी घराची स्थिती खराब होऊ शकते.
Vastu Tips
Vastu TipsSaam Tv
Published On

Vastu Tips For Dining Table :

वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशेला विशेष महत्त्व आहे. घरातील प्रत्येक कोना हा सकारात्मकतेने भरलेला असतो. परंतु, त्या ठिकाणी कोणतीही चुकीची गोष्ट ठेवल्यास घरात नकारात्मकता वाढू लागते.

असे म्हटले जाते की, आपल्या घरासोबत इतर अनेक गोष्टी आहेत ज्या वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) अधिक महत्त्वाच्या समजल्या जातात. घरातील डायनिंग टेबलवर ठेवलेल्या काही गोष्टी घराची स्थिती खराब होऊ शकते. ज्यामुळे घरातील सदस्यांना आरोग्याच्या (Health) बाबतीत तसेच आर्थिक स्थिती, करिअर (Career) आणि वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते.

वास्तूशास्त्रानुसार घरातील डायनिंग टेबलवर या गोष्टी ठेवल्या असतील तर आजच फेकून द्या. ज्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल

1. औषधे

घरातील जेवणाच्या टेबलवर औषधे ठेवू नका. जेवणाच्या टेबलवर दीर्घकाळ औषधे ठेवल्यास घरातील व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होतो. तसेच घरातील माणसे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.

Vastu Tips
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार या गोष्टी कधीही दुसऱ्यासोबत शेअर करु नका, भोगावे लागतील भयंकर परिणाम

2. भांड्यांचा सेट

अनेकांना सवय असते की, डायनिंग टेबलवर भांड्यांचा किंवा चमचे ठेवण्याची सवय असते. यामध्ये अनेक काट्याचे चमचे देखील यात असतात. ज्यामुळे घरात वाद निर्माण होण्याची शक्यता असते.

Vastu Tips
New Year 2024 Calendar : घरातील या दिशेला लावा नवीन वर्षाचे कॅलेंडर, वर्षभर पडेल पैशांचा पाऊस

3. फ्रूट बास्केट

जेवणाच्या टेबलवर नेहमी ताजी फळे ठेवायला हवी. डायनिंग टेबलवर कृत्रिम फळांची टोपली कधीही ठेवू नका. यामुळे घरातील सुख-शांती कमी होते. असे म्हटले जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com