कोमल दामुद्रे
वास्तूशास्त्रानुसार जर कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा असेल तर घरामधील अनेक अडचणीचा सामना सहज करता येतो.
कॅलेंडरची दिशा चुकली की, घरात नकारात्मकता येते असे म्हटले जाते.
लवकरच २०२४ च्या नवीन वर्षाला सुरुवात होईल. अनेक जण या दिवशी नवीन कॅलेडर लावतील. जाणून घेऊया कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती
वास्तूशास्त्रानुसार घरातील सकारात्मकता येणाऱ्या दिशेला कॅलेंडर लावल्याने सुख-समृद्धी येते.
कॅलेंडर लावण्यासाठी घराची पश्चिम दिशा अधिक चांगली समजली जाते. कारण ही प्रवाहाची दिशा आहे.
घराच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशांचा प्रवाह कायम राहातो. उत्पन्नाचे स्त्रोत वाढते. घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
घराची उत्तर दिशा देखील चांगली समजली जाते. ही दिशा भगवान कुबेर यांची असून या ठिकाणी कॅलेंडर लावल्याने धनसंपत्ती वाढते.
टीप :
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.