Wash New Clothes Before Wearing: नवीन कपडे पहिल्यांदा घालण्यापूर्वी धुवावेत का?

Surabhi Jayashree Jagdish

कपड्यांवर केमिकल्स

नवीन कपडे तयार करताना त्यांना रंग देण्यासाठी आणि आकर्षक बनवण्यासाठी काही रसायनांचा वापर केला जातो. कपड्यांवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी किंवा त्यांचा आकार टिकवण्यासाठीही काही रसायनं वापरली जाऊ शकतात. त्यामुळे पहिल्यांदा वापरण्यापूर्वी कपडे धुतल्यास त्यावरील काही रासायनिक अवशेष निघून जाण्यास मदत होते.

How to Wash New Clothes | saam tv

अनेकजण हाताळतात कपडे

कपडे तयार झाल्यानंतर ते पॅकिंग, वाहतूक आणि दुकानापर्यंत पोहोचण्याच्या अनेकजण कपडे हाताळतात. त्यामुळे कपड्यांवर धूळ, माती आणि इतर घाण जमा होऊ शकते.

Dust on New Clothes | saam tv

त्वचेची जळजळ आणि खाज

नवीन कपड्यांवरील रंग किंवा रासायनिक अवशेषांमुळे काही लोकांच्या त्वचेवर त्रास होऊ शकतो. यामुळे त्वचेला खाज सुटणं, लालसरपणा येणं किंवा जळजळ होण्याची शक्यता असते. कपडे पहिल्यांदा धुतल्यामुळे असे त्रास होण्याचा धोका कमी करण्यास मदत मिळते.

Baby Clothes Washing Tips | saam tv

अंतर्वस्त्रे आणि लहान मुलांचे कपडे

अंतर्वस्त्रं थेट शरीराच्या संपर्कात येत असल्यामुळे ती पहिल्यांदा वापरण्याआधी धुवावीत. लहान मुलांची त्वचा नाजूक असल्याने त्यांचे नवीन कपडेही आधी स्वच्छ धुणं महत्त्वाचं आहे. यामुळे कपड्यांवरील धूळ आणि काही रासायनिक अवशेष दूर होण्यास मदत होते.

Cotton Clothes Washing Tips | saam tv

कपडे धुताना कोणती काळजी घ्यावी?

नवीन कपडे धुण्यापूर्वी त्यांच्यावरील वॉशिंग लेबल नक्की वाचा. कपड्यांच्या प्रकारानुसार योग्य डिटर्जंट आणि पाण्याचे तापमान निवडा. रंगीत आणि पांढरे कपडे एकत्र धुणं टाळा, जेणेकरून एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागणार नाही.

Woollen Clothes Washing Tips | saam tv

धुण्याची पद्धत

कॉटन, सिल्क, लोकरीचे आणि इतर कापडांचे प्रकार वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक कपडा एकाच पद्धतीने धुणं योग्य नाही. काही कपडे हाताने धुवावे लागतात, तर काही कपड्यांसाठी ड्राय क्लीनिंगची गरज असते.

Laundry Tips for Beginners

नवीन कपडे पहिल्यांदा धुण गरजेचं?

नवीन कपडे पहिल्यांदा वापरण्याआधी धुणं ही चांगली सवय आहे. यामुळे कपड्यांवरील धूळ, घाण आणि काही रासायनिक अवशेष निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे नवीन कपडे घालण्याआधी ते स्वच्छ धुवा आणि मगच वापरा.

How to Prevent Skin Irritation | saam tv

Bike chain maintenance: बाईकची चेन किती दिवसांनी ल्युब्रिकेट करावी?

Bike chain maintenance | saam tv
येथे क्लिक करा