Shreya Maskar
मुंबई, ठाणे आणि कल्याणपासून जवळ असलेले बदलापूर हे निसर्गरम्य ठिकाणांसाठी ओळखले जाते. धरणे, तलाव, मंदिरे, धबधबे आणि हिरव्यागार परिसरामुळे येथे वीकेंडला किंवा वन डे पिकनिकसाठी छान पर्याय उपलब्ध आहेत.
कोंडेश्वर मंदिर- धबधबा हे बदलापूरजवळील लोकप्रिय निसर्गरम्य ठिकाण आहे. भगवान शंकराचे प्राचीन मंदिर, आजूबाजूचा डोंगराळ परिसर आणि पावसाळ्यात वाहणारा धबधबा हे येथील आकर्षण आहे. शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
बारवी धरण परिसरात निसर्गरम्य जलाशय आणि हिरवीगार वनराई पाहायला मिळते. सकाळच्या वेळी येथे पक्षीनिरीक्षण आणि निसर्गभ्रमंतीचा आनंद घेता येतो. धरणाच्या प्रतिबंधित भागात प्रवेश करू नये आणि पाण्यात उतरणे टाळावे.
बदलापूर आणि अंबरनाथच्या परिसरात असलेले चिखलोली धरण हे शांत वातावरणासाठी ओळखले जाते. धरणाच्या परिसरातून पाण्याचा साठा आणि आजूबाजूचा निसर्ग पाहता येतो. छोट्या सहलीसाठी किंवा निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण निवडता येईल.
बदलापूरमधील उल्हास नदीच्या परिसरात असलेले बॅरेज धरण हे स्थानिकांसाठी निवांत वेळ घालवण्याचे ठिकाण आहे. नदीचा परिसर आणि मोकळी जागा यामुळे येथे छोटी सहल किंवा संध्याकाळची भटकंती करता येते. पाण्याच्या प्रवाहाजवळ काळजी घ्यावी आणि पाण्यात उतरणे टाळावे.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात धरण परिसर, उद्यान यांना भेट देण्यासाठी हवामान तुलनेने आल्हाददायक असते. धबधबे पाहायचे असल्यास पावसाळा अधिक योग्य; मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असताना सुरक्षित अंतर ठेवावे.
तुम्ही मुंबईहून ट्रेनने बदलापूरला पोहचा. बदलापूर स्टेशनला उतरल्यावर रिक्षाने तुम्ही वर सांगितलेल्या पिकनिक स्पॉट्स जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
NEXT : थंडीत रत्नागिरीला येताय? मग 'ही' ७ सुंदर पर्यटनस्थळे पाहायला विसरू नका