Shreya Maskar
कोकण म्हटलं की हिरवीगार झाडं, नारळ-सुपारीच्या बागा, स्वच्छ समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य वातावरण डोळ्यांसमोर येतं. रत्नागिरी हा कोकणातील असाच सुंदर जिल्हा आहे. येथे समुद्रकिनाऱ्यांसोबत ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे पाहायला मिळतात.
रत्नागिरीपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेले गणपतीपुळे प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ आहे. येथे स्वयंभू गणपती मंदिर आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा पाहायला मिळतो. समुद्रकिनाऱ्यावरील शांत वातावरण आणि नारळ-सुपारीच्या बागा पर्यटकांना आकर्षित करतात.
रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ला भगवती किल्ला म्हणूनही ओळखला जातो. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्याच्या तीन बाजूंनी समुद्र आहे. किल्ल्यातील भगवती देवीचे मंदिर आणि समुद्राचे विहंगम दृश्य पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे.
आरे आणि वारे हे दोन सुंदर समुद्रकिनारे त्यांच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. येथील वळणदार किनारी रस्ता, निळाशार समुद्र आणि हिरवागार परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. समुद्राचे सुंदर दृश्य अनुभवण्यासाठी हे ठिकाण आवर्जून भेट देण्यासारखे आहे.
रत्नागिरी शहराजवळ असलेला भाट्ये समुद्रकिनारा लांब आणि सुंदर किनारपट्टीसाठी ओळखला जातो. येथे समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, निवांत वेळ घालवणे आणि सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत फिरण्यासाठी हे एक छान ठिकाण आहे.
देवघळी बीचला 'कशेळी बीच' म्हणूनही ओळखले जाते. हा किनारा खडकाळ कड्यांनी वेढलेला असून, येथे अरबी समुद्राचे नितळ पाणी पाहायला मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.