VASTU TIPS FOR DINING: 5 PLACES TO AVOID EATING TO PREVENT NEGATIVITY Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips for Dining : घरात 'या' 5 ठिकाणी बसून जेवण करणे टाळा; अन्यथा घरात येऊ शकते नकारात्मक ऊर्जा!

Vastu Tips for Dining at Home : वास्तुशास्त्रानुसार घरात चुकीच्या ठिकाणी बसून जेवल्याने नकारात्मक ऊर्जा येऊ शकते अशा कोणत्या जागा ते जाणून घ्या.

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्रानुसार घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून ते आपल्या ऊर्जा, आरोग्य आणि सुख-समृद्धीशी जोडलेले आहे. वास्तुशास्त्रात घरात सकारात्मक उर्जा टिकवून ठेवण्याचे अनेक नियम सांगितले आहेत. घरामध्ये तुम्ही जेवताना काही चुका करणे टाळा यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जा पसरते. अनेकदा आपण नकळत चुकीच्या ठिकाणी बसून जेवतो ज्याचा परिणाम घरातील नकारात्मक उर्जेशी जोडला जातो.

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात आपण कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या दिशेला तोंड करून जेवतो, याला विशेष महत्त्व दिले जाते. याचा संबंध आरोग्य, मानसिक त्रास आणि आर्थिक स्थितीशी आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील काही ठिकाणी बसून जेवणे टाळावे, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, अशी धार्मिक मान्यता आहे. चला तर जाणून घेऊया, घरातील कोणत्या ठिकाणी बसून जेवणे टाळावे.

बेडवर बसून जेवणे टाळा

वास्तुशास्त्रानुसार बेडवर बसून जेवणे योग्य मानले जात नाही. असे केल्याने राहू ग्रहाचा नकारात्मक प्रभाव वाढतो. तसेच यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि घरातील सुख-समृद्धी आणि सकारात्मक वातावरणावरही परिणाम होतो.

तुटलेल्या किंवा अस्वच्छ भांड्यांमध्ये जेवण करू नये

तुटलेल्या किंवा खराब झालेल्या भांड्यांमध्ये जेवणेही अशुभ मानले जाते. अशा भांड्यांमध्ये जेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आणि वादविवाद वाढू शकतात त्यामुळे नेहमी स्वच्छ आणि चांगल्या भांड्यामध्ये जेवण करणे.

जेवणाचे ताट

अनेकांना जेवताना ताट किंवा भांडे हातात धरून जेवण्याची सवय असते. वास्तुशास्त्रानुसार ही सवय योग्य मानली जात नाही यामुळे घरात नकारात्मकता वाढते आणि कुटुंबामध्ये वाद होतो.

स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ जेवणे टाळा

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर बसून जेवणे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे मानले जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होत असतो आणि अशा ठिकाणी बसून जेवल्याने घरातील ऊर्जेचे संतुलन बिघडू शकते. तसेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते.

अंधाऱ्या किंवा कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी जेवणे टाळा

घरातील अंधाऱ्या किंवा कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी बसून जेवणे टाळावे. अशा वातावरणात जेवल्याने मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवताना उजेड असलेल्या ठिकाणी जेवण करा.

बाथरूम किंवा टॉयलेटजवळ बसून जेवणे टाळा

अनेकजण बाथरूम किंवा टॉयलेटच्या जवळ बसून जेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ही सवय चुकीची मानली जाते. अशा ठिकाणी जेवल्याने आरोग्यावर आणि अन्नाच्या शुद्धतेवर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cooking Tips : चपात्या तासनतास मऊ आणि लुसलुशीत राहण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

नगरसेवकपद देतानाच ६ जणांकडून घेतले राजीनामे; नाशिक महापालिकेत भाजपचा अजब फॉर्म्युला

लाडक्या बहिणींना मिळणार 3000? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार

Maharashtra News Live Update: एसटी कर्मचाऱ्यांच काम बंद आंदोलन थांबविण्यात परिवहन विभागाला यश

सावधान! मोमोजसोबत मिळणारी लाल चटणी ठरू शकते आरोग्यासाठी घातक

SCROLL FOR NEXT