Manasvi Choudhary
अनेकदा शांत बसले असताना किंवा काही वेळा जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर आपल्या पोटातून गुडगुड असा आवाज येतो.
पोटातून येणारा हा आवाज तुम्हाला काही संकेत देत असते त्यामुळे याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.
पोटातून येणाऱ्या गुडगुड या आवाजामागे नेमकं काय कारण आहे. ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
जेव्हा शरीरात पचनक्रिया ही प्रक्रिया सुरू असते तेव्हा पोटातून गुडगुड हा आवाज येऊ शकतो. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा पोट आणि आतडे ते अन्न पचवण्यासाठी आकुंचन आणि प्रसरण पावतात या प्रक्रियेदरम्यान अन्न, पाचक रस आणि वायू एकत्र मिसळून पुढे सरकतात, ज्यामुळे हवेचे बुडबुडे फुटून गुडगुड असा आवाज निर्माण होतो.
जेव्हा पोट रिकामे असते, तेव्हा मेंदू पोटाला आणि आतड्यांना अन्न खाण्याचे सिग्नल पाठवतो. यामुळे आतड्यांमधील स्नायू वेगाने हालचाल करू लागतात तेव्हा पोटात गुडगुड असा आवाज होतो.
शरीरात अन्नाचे पचन सुरळीत पार पडले नसेल तेव्हा पोटात गॅस- अॅसिडीट होते तेव्हा गुडगुड असा आवाज होतो.
जेव्हा आपण खाताना किंवा बोलताना नकळत काही प्रमाणात हवा गिळतो. तसेच काही खाद्यपदार्थ पचताना पोटात अतिरिक्त गॅस तयार होतो. हा वायू आतड्यांमधून बाहेर पडताना पाण्याचा संपर्क आल्याने गुडगुड आवाज होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञाननावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.