Manasvi Choudhary
दिवाळी आकाशात फटाके फोडले जातात, तेव्हा संपूर्ण आकाश लाल, हिरवा, निळा आणि सोनेरी रंगांनी उजळून निघते. ही रंगीबेरंगी आतषबाजी पाहताना प्रत्येकालाच आनंद होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, फटाक्यांमधून हे विविध रंग नेमके कुठून येतात?
फटाक्यामधील रंगामागे रसायनशास्त्र दडलेले आहे. जेव्हा फटाक्यात वापरलेला गनपावडर जळतो, तेव्हा उच्च तापमान निर्माण होते. या उष्णतेमुळे फटाक्यात मिसळलेल्या धातूच्या क्षारांमधील इलेक्ट्रॉन उत्तेजित होतात.
जेव्हा हे इलेक्ट्रॉन पुन्हा आपल्या मूळ स्थितीत येतात, तेव्हा ते विशिष्ट उर्जेचा आणि तरंगलांबीचा प्रकाश बाहेर टाकतात, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात.
आकाशात दिसणारा गडद लाल रंग स्ट्रॉन्शियम या धातूच्या संयुगांमुळे येतो. यासाठी प्रामुख्याने स्ट्रॉन्शियम कार्बोनेट किंवा स्ट्रॉन्शियम क्लोराईड चा वापर केला जातो.
फटाक्यांमधील अतिशय चमकदार हिरवा रंग बेरियमच्या संयुगांमुळे निर्माण होतो. यासाठी बेरियम क्लोराईड किंवा बेरियम नायट्रेट हे रसायन वापरले जाते.
निळा रंग तयार करण्यासाठी तांबे म्हणजेच कॉपर चे घटक वापरले जातात. कॉपर क्लोराईड किंवा कॉपर एसीटेट मुळे फटाक्यांमध्ये सुंदर निळा रंग दिसतो.