Vastu tips Clothes saam tv
लाईफस्टाईल

Vastu tips: 'या' दिवशी तुम्हीही कपडे धुत असाल तर व्हाल कंगाल! वास्तू शास्त्राचा नियम काय सांगतो?

Vastu tips Clothes: ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, वास्तू शास्त्राला देखील महत्त्व देण्यात येतं. वास्तू शास्त्रामध्ये अनेक नियमांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. यात कपड्यांचे नियम काय आहेत हे जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या घरात सुख आणि समाधान यावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी खरेदी करताना अनेक जण वास्तू तज्ज्ञांची मदत घेतात. हिंदू धर्मामध्ये ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे वास्तू शास्त्राला देखील महत्त्व देण्यात आलं आहे. वास्तू शास्त्रामध्ये अनेक नियम देण्यात आले आहेत. यामध्ये कपड्यांबाबत नियमांची माहिती दिली गेलीये.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर वास्तू शास्त्राच्या नियमांचं पालन केलं तर कोणतीही समस्या आपल्या जवळ येत नाही. मात्र जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही तर वास्तूदोषाचा सामना करावा लागू शकतो. अशातच आपण कपडे धुण्याचं काम जवळपास दररोज करतो. मात्र तुम्हाला माहितीये का यामध्ये देखील वास्तूशास्त्राचा विचार करावा लागतो.

वास्तू शास्त्रानुसार, कपडे खदी धुवावेत याबाबत माहिती देण्यात आली आहे. याशिवाय कधी कपडे धुवू नयेत हे देखील जाणून घेऊ.

कपडे कधी धुवू नयेत?

वास्तू शास्त्रानुसार, कधीही रात्रीच्या वेळेस कपडे धुवू नये. असं करणं फार अशुभ मानण्यात येतं. असं म्हटलं जातं की, रात्रीच्या वेळेस कपडे धुतल्याने व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी ग्रहाचा प्रभाव वाढतो. ज्याचे अनेक नाकारात्मक परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. यामुळे गरिबी तसंच मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

कोणत्या दिवशी कपडे धुवू नयेत?

आठवड्यातील सात दिवस हे फार महत्त्वपूर्ण असतात. मात्र गुरुवारचा दिवस भगवान विष्णूंचा असतो. या दिवशी विष्णूंसोबत लक्ष्मी देवीचीही पुजा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी घाणेरडे कपडे धुतल्याने किंवा पाणी जास्त प्रमाणात वाहू दिल्याने पवित्रता भंग होऊ शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT