Vastu Tips for Stairs: घरातील पायऱ्यांखाली चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका; आर्थिक हानी होऊन दारिद्र घरात येईल

Vastu Tips for Stairs: हिंदू धर्मशास्त्रानुसार, घरातमध्ये कोणत्या गोष्टी कोणत्या दिशेला ठेवल्या पाहिजेत, याबाबतही माहिती देण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या चुकूनही घराच्या पायऱ्यांखाली ठेवू नयेत.
Vastu Tips for Stairs
Vastu Tips for Stairssaam tv
Published On

वास्तूशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार, वस्तूत सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा वास आहे. काही वस्तूंमधून सकारात्मक उर्जेचा संचार घरात होतो असं वास्तू शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, घरातमध्ये कोणत्या गोष्टी कोणत्या दिशेला ठेवल्या पाहिजेत, याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

वास्तू शास्त्राच्या नियमांचं पालन करून घर बांधलं तर कुटुंबात सुख-समृद्धी येते. तर दुसरीकडे या नियमांचं उल्लंघन केल्यास गरीबी घरामध्ये प्रवेश करते असंही म्हणतात. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या चुकूनही घराच्या पायऱ्यांखाली ठेवू नयेत. जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत.

Vastu Tips for Stairs
Tawa Vastu Shastra: किचनमध्ये तवा वापरताना वास्तूच्या नियमांकडे लक्ष द्या; एक छोटी चूक पडेल महागात

घरातील जिन्यांखाली ठेऊ नका या गोष्टी

कुटुंबातील लोकांचे फोटो

घरातील जिन्यांखाली जागा रिकामी असते, त्यामुळे अनेकजण या ठिकाणी घराचा फॅमिली फोटो लावतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करणं चुकीचं आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे फोटो पायऱ्यांखाली ठेवल्याने घरात कलह निर्माण होण्याचा धोका असतो.

कचऱ्याची कुंडी

जिन्याखाली कमी जाहा असल्याने आपल्यापैकी अनेकजण त्या ठिकाणी कचऱ्याचा डबा ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या जिन्याखाली कचऱ्याचा डबा कधीही ठेवू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढत असल्याचं मानलं जातं.

वॉशरूम बांधू नये

घराच्या पायऱ्यांखाली शौचालय किंवा स्वयंपाकघर बनवू नये. वास्तुशास्त्रानुसार, असं केल्याने घरात अनेक समस्या येतात. त्याचप्रमाणे घरात आजारापणाच्या समस्या वाढण्याचा धोका असतो.

घरातील देव्हारा

अनेकजण जिन्याखाली रिकामी जागा असल्याने देव्हाऱ्या त्या ठिकाणी मंदिराची स्थापना करतात. असं करणं अत्यंत अशुभ मानलं जातं. असं केल्याने पायऱ्या चढून खाली जाणाऱ्या लोकांच्या चपलांची धूळ मंदिरावर पडते. यामुळे देवाचा अपमान होतो.

Vastu Tips for Stairs
Vastu Tips for Shoes: घरात चपला-शूज नेमक्या कोणत्या दिशेला ठेवल्या पाहिजेत? चूक केलीत तर लक्ष्मी देवी होईल नाराज

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com