Vastu Tips for Shoes
Vastu Tips for Shoessaam tv

Vastu Tips for Shoes: घरात चपला-शूज नेमक्या कोणत्या दिशेला ठेवल्या पाहिजेत? चूक केलीत तर लक्ष्मी देवी होईल नाराज

Vastu Tips for Shoes: घरातील वास्तू दिशांना विशेष महत्त्व देण्यात आलंय. घरात कुठेही बूट आणि चप्पल ठेवल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो, असं मानलं जातं.
Published on

आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आरोग्यदायी व्हावी असं सर्वांचं मत असतं. परंतु अनेकदा सकाळी उठल्यावर नकळतपणे आपल्या हातातून काही चुका घडतात. त्याचा थेट परिणाम आपल्या कामावर किंवा आरोग्यावर होताना दिसतो. घरात अशा गोष्टी घडू नयेत यासाठी लोकं वास्तू शास्त्राची मदत घेतात.

वास्तू शास्त्रानुसार, घरातील वास्तू दिशांना विशेष महत्त्व देण्यात आलंय. असं म्हटलं जातं की, जर घरात चुकीच्या दिशेने काही गोष्टी ठेवल्या तर त्याचा घरातील सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धीवर विपरीत परिणाम होतो.

Vastu Tips for Shoes
Tawa Vastu Shastra: किचनमध्ये तवा वापरताना वास्तूच्या नियमांकडे लक्ष द्या; एक छोटी चूक पडेल महागात

अशा स्थितीत घरातील सदस्यांनाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही. या नियमांमध्ये घरातील व्यक्तींच्या चपला आणि शूज यांच्या दिशेबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. घरात कुठेही बूट आणि चप्पल ठेवल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो, असं मानलं जातं. यासाठी आपले शूज नेमके कुठे ठेवले पाहिजेत, ते समजून घेऊया.

घरात शूजबाबत असलेले नियम

घरात कसे ठेवावे शूज?

घरामध्ये शूज आणि चप्पल कधीही उलट्या ठेवू नयेत. असं म्हटलं जातं की, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येण्याचा धोका असतो. अशावेळी घरात लक्ष्मी देखील येत नाही. त्यामुळे घरावर आर्थिक संकट येण्याचा धोका असतो.

या दिशेला कधीही ठेऊ नयेत शूज

वास्तू शास्त्रानुसार, शूज आणि चप्पल उत्तर किंवा पूर्व दिशेला कधीही ठेवू नयेत. ही देवी लक्ष्मीची दिशा असून या दिशेला शूज ठेवल्यास घरामघ्ये लक्ष्मीचा वास घरात राहत नाही. यामुळे तुमच्या घरावर सतत दारिद्र राहू शकतं.

कोणत्या दिशेला ठेवाव्यात चपला?

वास्तूनुसार घरात शूज आणि चप्पल नेहमी कपाटात ठेवल्या पाहिजेत. कपाटाची दिशा दक्षिण किंवा पश्चिम ठेवली पाहिजे. शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी ही दिशा योग्य मानली जाते. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी मानली जाते.

बेडरूममध्ये ठेऊ नयेत चपला

शूज आणि चप्पल कधीही घराच्या बेडरूममध्ये ठेवू नयेत. वास्तू शास्त्रानुसार, वैवाहिक जीवनात यामुळे तणाव वाढतो, असं मानलं जातं. पती-पत्नीच्या नातेसंबंधावर विपरीत परिणाम होण्याचाही धोका असतो. अग्नी आणि अन्न या दोन्ही गोष्टी पूजनीय असल्याने किचनमध्ये शूजचा वापर करू नये. शूज आणि चप्पल स्वयंपाकघरात ठेवणे अशुभ मानले जाते.

Vastu Tips for Shoes
Vastu Shastra For Dining Table: डायनिंग टेबलवर 'या' गोष्टी ठेवत असाल तर आजच काढून टाका; नात्यांमध्ये येईल दुरावा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com