Varicose veins treatment SAAM TV
लाईफस्टाईल

Varicose veins treatment: शस्त्रक्रियेशिवाय 'या' पद्धतींनी व्हेरिकोज्ह व्हेन्सवर उपचार करणं शक्य; तज्ज्ञांनी दिली आधुनिक उपचारांची माहिती

Varicose veins treatment without surgery: व्हेरिकोज व्हेन्स ही एक सामान्य समस्या आहे. पूर्वी यावर शस्त्रक्रिया हाच मुख्य उपाय होता, पण आता वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे अनेक आधुनिक आणि कमीतकमी-आक्रमक (Minimally-Invasive) उपचार पद्धती उपलब्ध आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

पायांवरील फुगलेल्या, वळवळलेली नसा म्हणजे व्हेरिकॉस व्हेन्स. ही समस्या अनेक महिलांमध्ये आणि दिवसभर उभं राहून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येते. सुरुवातीला ही नुसती सौंदर्यविषयक अडचण वाटली तरी पुढे वेदना, सूज, जळजळ, आणि जखमा यासारख्या गंभीर त्रासात रूपांतर होऊ शकते.

मुळात ही एक सामान्य समस्या आहे. ज्यामध्ये पायांमधील शिरा सुजतात, फुगतात आणि पीळ पडल्यासारख्या दिसतात. ही समस्या जगभरात आणि भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येते. जगभरात व्हेरिकोज्ह व्हेन्सचे प्रमाण खूप जास्त आहे. वेगवेगळ्या अभ्यासानुसार, जगातील १०% ते ३०% लोकसंख्येला या समस्येचा त्रास होतो. काही अभ्यासांमध्ये हे प्रमाण ७३% पर्यंतही आढळून येतं.

उपाय काय?

नागपूरमधील अँजिओग्राफी आणि व्हेन क्लिनिकमधील अँजिओप्रो इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीचे संचालक डॉ. अर्पित धकाते यांनी सांगितलं की, आज या समस्येवर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीच्या माध्यमातून शस्त्रक्रियेशिवायआधुनिक उपाय उपलब्ध आहेत. यामध्ये दोन प्रमुख उपचारपद्धती आहेत. यामध्ये एंडोवेनस लेसर उपचार आणि Glue Embolization यांचा समावेश आहे.

एंडोवेनस लेसर उपचार (EVLT / RFA)

हे उपचार लेसर किंवा रेडिओफ्रीक्वेन्सीच्या साहाय्याने रोगट नस आतून बंद करून केल्या जातात. हा उपचार छोट्या छिद्रातून, संपूर्णपणे वेदनारहित पद्धतीने केला जातो.

ग्लू एम्बोलायझेशन

ही सर्वात आधुनिक आणि नाविन्यपूर्ण पद्धत आहे. यात कोणतीही लेसर, गरम उपकरण किंवा सुई लावली जात नाही. एक विशेष वैद्यकीय ग्लू म्हणजेच गोंद नसेमध्ये सोडला जातो, ज्यामुळे ती नसा कायमची बंद होते.

या उपचारांचे फायदे

  • कोणतीही शस्त्रक्रिया नाही

  • टाके किंवा जखम नाही

  • ऍनेस्थेशियाची गरज नाही

  • रुग्ण लगेच चालू शकतो

  • सौंदर्यदृष्टीने अधिक सुरक्षित

लक्षणं ओळखा

  • पाय सुजणे किंवा जडपणा जाणवणे

  • नसा बाहेर दिसणे

  • रात्री पायांना मुंग्या येणे किंवा वेदना होणे

  • त्वचेला काळसर रंग येणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT