Weight loss: वजन कमी करायचंय? फक्त 28 दिवसांचं हे चॅलेंज करा, फिटनेस कोचने सांगितला प्लान

Weight loss 28 day challenge : वजन कमी करणे हे एक आव्हान असू शकते, परंतु योग्य मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे ते सहज शक्य आहे. वजन कमी करण्यासाठी कोणताही जादूई उपाय नसतो, पण योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांचा एकत्रीकरण खूप प्रभावी ठरते.
Weight loss 28 day challenge
Weight loss 28 day challengesaam tv
Published On

फीट आणि फाईन राहिलं पाहिजे अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. मात्र कामाच्या बिझी शेड्यूलमुळे ते शक्य होत नाही. यासाठी अनेकदा आपण जीम किंवा व्यायाम करण्याचं रूटीन सुरु करतो. मात्र काही दिवसांनी पुरेसा वेळ मिळत नसल्याने ते देखील थांबतं. जर तुम्हीही यामध्ये अडकून पडला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक चॅलेंजबद्दल सांगणार आहोत.

इन्स्टाग्रावर फिटनेस कोच लेसी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी २८ दिवसांचा एक चॅलेंज ट्राय करायला सांगितला आहे. यामध्ये तुमच्या सवयी बदलून एनर्जीमध्ये वाढण होणार आहे. या २७ दिवसांच्या चॅलेंजमध्ये काय करायचं आहे ते जाणून घेऊया.

28 दिवसांसाठी सोड्याला "नाही" म्हणा

या २८ दिवसांत तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स पूर्णपणे सोडायचे आहेत. यामध्ये सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण या सवयीने शरीरातली ब्लोटींग कमी होते, पचन सुधारतं आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. साखरेचं प्रमाण कमी केल्यावर एनर्जी लेव्हलसुद्धा स्थिर राहते.

Weight loss 28 day challenge
Tongue color and health: गुलाबी, लाल की पांढरा...तुमची जीभ काय सांगते? रंगावरून जाणून घ्या तुम्ही आजारी आहात की नाही!

दररोज २ लिटर पाणी प्या

शरीराचं डीटॉक्सिफिकेशन, पचनक्रिया आणि त्वचेचं आरोग्य या सगळ्यांसाठी पाण्याचं महत्त्व खूप आहे. त्यामुळे या २८ दिवसांत तुम्ही दररोज २ लिटर पाणी पिण्याचा संकल्प करा. गरज पडल्यास फोनमध्ये रिमाइंडर्स लावा. याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होणार आहे.

१५ मिनिटांचं वर्कआउट

तुम्हाला जीमला जाण्याचा कंटाळा येत असेल किंवा वेळ मिळत नसेल तर जाऊ नका. मात्र आठवड्यातून तीन वेळा १५ मिनिटांचं brisk walk, घरचं HIIT वर्कआउट, झुंबा किंवा अगदी योगासुद्धा करू शकता. मात्र यामध्ये सातत्य महत्वाचं आहे. वेळ कमी असला तरी अशा छोट्या वर्कआउट्सनीही ऊर्जा वाढते.

Weight loss 28 day challenge
Common sleep pattern dangerous : झोपेदरम्यान हा कॉमन पॅटर्न ठरू शकतो जीवघेणा; संशोधनातून धक्कादायक बाब उघड

रोज सकाळी २० स्क्वॉट्स

सकाळचा व्यायाम देखील फायद्याचा ठरतो. यावेळी झोपेतून उठल्यावर लगेच २० स्क्वॅट्स करा. यामुळे पायांमध्ये ताकद येते, स्नायू एक्टिव्ह होतात आणि शरीरात रक्ताभिसरण सुधारतं. कॅफिनशिवाय फ्रेश वाटण्यासाठीचा हा उत्तम पर्याय मानला जातो.

रात्री झोपण्यापूर्वी ३० सेकंदाचा प्लँक करा

दिवसाच्या शेवटी फक्त ३० सेकंदासाठी प्लँक करणंही तुमच्या फायद्याचं आहे. यामुळे कोअर मजबूत होतं. त्याचप्रमाणे शरीराचं पोश्चर सुधारतं आणि झोपण्याआधी शरीराला एक शांत सिग्नल मिळतो.

Weight loss 28 day challenge
High cholesterol pain symptoms : रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरातील 'या' भागात होतात वेदना; वेळीच लक्ष देणं ठरेल फायद्याचं

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com