
प्रत्येक व्यक्तीचा एक रक्तगट म्हणजेच ब्लड ग्रुप असतो. जगात असे काही ठराविक रक्तगट आहेत. मात्र आता अजून एक नवा ब्लड ग्रुप समोर आला आहे. जगभरात आजवर जितके रक्तगट सापडले आहेत त्यात आता एक नवीन आणि अत्यंत दुर्मीळ ब्लड ग्रुपची नोंद झालीये . विशेष म्हणजे, हा ब्लड ग्रुप आजवर फक्त एका महिलेमध्येच आढळला आहे!
या रक्तगटाचं वैशिष्ट्य असं की, या महिलेच्या शरीरात दुसऱ्या कोणत्याही ४७ ब्लड ग्रुप्सपैकी एकाचाही रक्तगट मॅच होत नाही. त्यामुळे यासोबत संबंधित उपचार करणं फारच कठीण मानलं जातंय.
फ्रान्समधील संशोधकांनी हा नवीन ब्लड ग्रुप शोधून काढला आहे. यावेळी संशोधकांनी अल्ट्रा रेअर म्हणजेच "अत्यंत दुर्मीळ" असा घोषित केला आहे. या रक्तगटाची नोंद ग्वाडेलूप बेटावर राहणाऱ्या एका महिलेच्या शरारातून झाली आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, हा आतापर्यंतचा ४८वा ओळखलेला ब्लड ग्रुप आहे.
फ्रान्सच्या EFS (Établissement Français du Sang) रक्तपेढी संस्थेने या रक्तगटाला "Gwada Negative" (ग्वाडा निगेटिव्ह) असं नाव दिलं आहे. आत्तापर्यंत ही एकमेव रुग्ण (महिला) आहे, जिचा हा रक्तगट आहे.
या रक्तगटाचा शोध खरंतर २०११ सालीच सुरू झाला होता. त्या वेळी या ५४ वर्षीय महिलेचं एक ऑपरेशन होणार होतं आणि त्यासाठी रक्ताची गरज होती. मात्र आश्चर्य म्हणजे, कोणत्याही रक्तदात्याचं रक्त तिच्याशी मॅच होत नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांनी तिचं हिमोग्लोबिन वाढवण्याचे वेगळे प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान, तिच्या रक्तात एक खूपच वेगळ्या प्रकारची अँटीबॉडी आढळून आली. हे काहीतरी वेगळं असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं.
रक्तगट ही गोष्ट केवळ रक्त चढवतानाच नाही, तर अवयव प्रत्यारोपण आणि काही विशिष्ट आजार ओळखण्यासही महत्त्वाची ठरतं. योग्य रक्तगट न मिळाल्यास रुग्णाचा जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नव्या रक्तगटाचा शोध हा वैद्यकीय क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा असतो.
अमेरिकेतील CDC (Centers for Disease Control and Prevention) या आरोग्य संस्थेनुसार, अमेरिकेत दरवर्षी जवळपास १.४ कोटी युनिट्स रक्त चढवण्यात येतं. त्यामध्ये ए, बी, ओ हे सर्वसामान्य गट असले तरी, जगात अनेक दुर्मीळ रक्तगट सुद्धा आढळले आहेत. आता या नव्या ब्लड ग्रुपचीही इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजनने अधिकृत नोंद घेतलीये .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.