Teddy Day SaamTv
लाईफस्टाईल

Teddy Day : टेडी बेअरसोबत 'त्या' प्रिय व्यक्तीला द्या या रोमॅंटिक मराठी शुभेच्छा, टेडी डे होईल खास | Marathi News

Valentines Week : व्हॅलेंटाईन वीकमध्ये चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला जातो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींना टेडी देऊन आपल्या प्रेमाच्या सौम्य भावना व्यक्त केल्या जात असतात.

Saam Tv

फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमी जोडप्यांना व्हॅलेंटाईन वीकचा वेध लागत असतो. सध्या हा व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि उद्या म्हणजेच १० फेब्रुवारी हा प्रेमाच्या या आठवड्याचा चौथा दिवस आहे. हा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी जोडपी एकमेकांना टेडी भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करत असतात. असे म्हणतात की तुम्ही भेट दिलेला टेडी बेअर तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्यापासून दूर असतानाही तुमच्या प्रेमाची आठवण करून देत असतो.

टेडी बेअर हे फक्त एक खेळणे नाही तर प्रेम आणि आठवणींची एक सुंदर भावना आहे. त्यामुळे सुंदर, मऊ, गोंडस टेडी देऊन आपल्या सौम्य प्रेमाची भावना प्रिय व्यक्तीकडे व्यक्त केली जाते. मात्र केवळ टेडी देणं पुरेसं असतं का? टेडी देताना आपल्या मनातल्या भावना देखील समोरच्या व्यक्तीला कळाव्या असं आपल्याला वाटत असतं. त्यासाठी या भावना कशा व्यक्त करायच्या असा प्रश्न आपल्याला कायम पडतो. त्यासाठी आम्ही खास टेडी डेचे मेसेज तुम्हाला सांगणार आहे. जे तुमचा टेडी डे अजून खास बनवून तुमचं नातं घट्ट बनवतील.

१. टेडी एक अशी गोष्ट असते जी रात्री झोपण्यापासून ते सकाळी उठण्यापर्यंत आपल्यासोबत असतो. अगदी तसंच मला तुझ्यासोबत रहायचं आहे. Happy Teddy Day To You..

२. धक्काधक्कीच्या आयुष्यात दोन क्षण आपण फक्त टेडीला मिठीत घेऊन स्ट्रेस फ्री होऊ इच्छित असतो. अगदी तसंच मला तुला मिठीत घ्यायचंय. Happy Teddy Day to you..

३. हा टेडी पाहिल्यावर जितका आनंद तुला झाला तितकाच आनंद तू माझ्या आयुष्यात आल्याने मला झाला आहे. तू माझ्या आयुष्यात अशीच आनंदाची बरसात करत रहा. Happy Teddy Day to you..

४. तू माझं प्रेम स्विकारलंस ही माझ्यासाठी खरं तर फार मोठी गोष्ट आहे. मात्र, सध्या मी कायमस्वरुपी तुझ्याजवळ राहू शकत नाही. मात्र, माझ्या रुपाने हा टेडी मी तुला देत आहे. Happy Teddy Day to you..

५. तू नेहमी माझ्या विचारांमध्ये, माझ्या स्वप्नांमध्ये आणि माझ्या हृदयात आहेस. मी कुठेही गेलो तरी तू नेहमी माझ्या जवळ असशील. टेडी बेअर डे २०२४ च्या शुभेच्छा!

६. जेव्हा मी त्याला मिठी मारतो तेव्हा माझा टेडी मला तुझी आठवण करून देतो. ते तुझ्यासारखेच मऊ आणि उबदार आहे. टेडी डे २०२४ च्या शुभेच्छा! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो Beary!

७. तू नेहमी माझ्या विचारात आणि स्वप्नात असतोस; मी कुठेही जाईन, तू नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ राहशील. या टेडी डे 2024 वर, माझ्या प्रिये, मला तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणायचे आहे..

८. माझ्या गोड, मोहक आणि चैतन्यशील अशा टेडीला, टेडी बेअर डेच्या शुभेच्छा. माझे तुझ्यावरचे प्रेम अपार आहे. नेहमी माझे टेडी अस्वल व्हा..

९. माझ्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ आणि महत्त्वपूर्ण व्यक्तीसाठी एक आनंददायक टेडी बेअर! टेडी बेअर डेच्या शुभेच्छा!

१०. माझ्या प्रिये, टेडी बेअर डे च्या शुभेच्छा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझी आवडता टेडी आहेस. माझ्यावर विश्वास ठेव!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT