Yoga Tips Special For Women Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga Tips Special For Women : कमी वयातच कंबर-गुडघेदुखीचा त्रास जडलाय? हा योग करुन पाहाच

Yoga Tips : तुमच्या दिनचर्येत योगासने समाविष्ट करून तुम्ही निरोगी राहू शकता.

Shraddha Thik

Pregnant Women Health :

जीवनात योगाचे स्वतःचे महत्त्व आहे. तुमच्या दिनचर्येत योगासने समाविष्ट करून तुम्ही निरोगी राहू शकता. योगाभ्यासाचा नियमित सराव तुम्हाला अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून वाचवू शकतो.त्यामुळे आज उत्कट कोनासनाचे फायदे सांगणार आहोत. जिममध्ये जे वाइड रुकवॉटस करतात त्या स्थितीला योगाभ्यामध्ये उत्कट कोनासन म्हणतात. त्या इंग्रजीत गॉडेस पोझ असेही म्हणतात.

हे आसन महिलांसाछी खूप महत्त्वाचे आहे. महिलांनी नियमितपणे उत्कट कोनासन केल्यास हॅमस्ट्रिंग, गुडघे आणि कंबरेच्या खालच्या (हिप्स) भागाला फायदा होतो. उत्कट कोनासन महिलांसाठी गरोदरपणात खूप फायदेशीर आहे. योगतज्ज्ञ रुमा शर्मा यांनी उत्कट कोनासन करण्याच्या पद्धती आणि फायदे (Benefits) सांगितले आहे.

उत्कट कोनासन म्हणजे काय?

उत्कट कोनासन हे हिप्स, पोट, छाती आणि कंबर तसेच पाय यांच्या स्नायूंसाठी खूप उपयुक्त मानले जातात. योग तज्ज्ञ रुमा शर्मा सांगतात की उत्कट कोनासन करण्यासाठी आधी पायांमध्ये समान अंतर ठेवा आणि उभे राहा. पाय समांतर ठेवून पायाची (Legs) बोटे बाहेरच्या बाजूला वाकवा.

यादरम्यान, तुमच्या पायाची टाच शरीराजवळ ठेवा, यानंतर, गुडघे वाकवून नितंब खाली आणा, मानस्कर मुद्रेत तुमचे दोन्ही तळवे एकत्र करा, छाती पुढे करा आणि खांदे थोडे मागे ठेवा. तुम्ही या स्थितीत रहा आणि सामान्यपणे आणि खोल श्वास घ्या. श्वास सोडल्यानंतर पोट आकुंचन पावून मागचा भाग खाली दाबा. आता हळूहळू पोझ सोडा आणि सामान्य स्थितीत या.

उत्कट कोनासनाचे फायदे

गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान या योग आसनाचा सराव करणे खूप फायदेशीर आहे. उत्कट कोनासनाचा सराव शरीराचे स्नायू ताणून उघडण्याचे काम करतो. या आसनाचा सराव केल्याने हिप्स, गुडघे आणि घोट्यालाही फायदा होतो. महिलांच्या प्रजनन अवयवांशी संबंधित समस्यांमध्ये हे आसन खूप फायदेशीर मानले जाते.

याचा नियमित सराव केल्याने तणाव आणि नैराश्य (Depression) यासारख्या मानसिक समस्यांपासून आराम मिळतो. या आसनाचा नियमित सराव संधिवात, किडनी, अंडाशय आणि मूत्राशयाच्या समस्यांवर फायदेशीर मानला जातो. त्याच्या नियमित सरावाने श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुधारते आणि फुफ्फुसांना फायदा होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT