ऑफिसमध्ये काम करताना खराब जीवनशैली यांचा आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. अनेक लोकांना डेक्सवर काम करताना मान, पाठ आणि कंबर दुखण्याच्या समस्येने त्रस्त असतात. वेदनांच्या समस्येचे निराकरण झाले नाही तर वेदना वाढू शकते आणि अधिक गंभीर शारीरिक समस्या बनू शकते.
कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम (Work) करताना डोळ्यांपेक्षा खांद्यावर जास्त ओझे असते. चुकीच्या हालचालींमुळे खांदे, मान, पाठ आणि कंबरेवरील दाब कमी करण्यासाठी योगासने करून वेदनांपासून आराम मिळू शकतो. सतत डेस्कवर काम केल्यामुळे मान आणि पाठदुखीसाठी ही योगासने फायदेशीर आहेत हे जाणून घेऊया.
ताडासन
हे आसन करण्यासाठी, दोन्ही पायांची टाच आणि बोटे यांच्यामध्ये अंतर ठेवून उभे राहा. आता तुमचे हात कंबरेच्या पातळीच्या वर घ्या आणि तुमचे तळवे आणि बोटे जोडा. मान (Neck) सरळ ठेवून टाच वर करा आणि संपूर्ण शरीराचा भार पायाच्या बोटांवर ठेवा. यावेळी, आपले पोट आत ठेवा. या स्थितीत काही काळ संतुलन ठेवा. मग पूर्वीच्या स्थितीत या.
सेतुबंधासन
हे योग आसन डेस्कवर काम करणाऱ्यांसाठी फायदेशीर (Benefits) आहे. सेतू बंधनासन करण्यासाठी पाठीवर झोपा आणि दोन्ही पायांचे गुडघे वरती उचली आणि तळवे जमिनीवर स्पर्श करून ठेवा. आता हाताच्या साहाय्याने शरीरावर करा. पाठ आणि मांड्या जमिनीवरून वरच्या दिशेने उचला, दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. काही काळ या स्थितीत राहा आणि नंतर पूर्वीच्या स्थितीत या.
भुजंगासन
या आसनाचा सराव करण्यासाठी पोटावर सरळ झोपा आणि तुमचे तळवे खांद्याच्या खाली ठेवा. आता बोटे पसरून छाती वर खेचा. या स्थितीत राहा आणि श्वास घ्या. मागील स्थितीवर परत या.
शोल्डर ओपनर
हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहा आणि तुमचे स्नायू शिथिल करा. आता तळवे मागे हलवा आणि त्यांना एकत्र करा. खांदे शक्य तितके मागे खेचा. नंतर जुन्या स्थितीत परत या आणि प्रक्रिया पुन्हा करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.