Yoga For Lazy people : आळस झटकून रोज 'ही' योगासने करा, दिवसभर राहाल फ्रेश

Yoga Tips : अनेक लोकांना नेहमी सुस्ती येते. काम करावंसं वाटत नाही आणि उत्साही राहत नाही.
Yoga For Lazy people
Yoga For Lazy peopleSaam Tv
Published On

Yoga For Stamina :

अनेक लोकांना नेहमी सुस्ती येते. काम करावंसं वाटत नाही आणि उत्साही राहत नाही. अशा लोकांसाठी काही योगासनांच्या टिप्स येथे पाहूयात, जे केल्याने तुम्हाला स्फुर्ती येईल आणि याशिवाय या योगामुळे तुमचा स्टॅमिनाही वाढेल. त्यामुळे विलंब न करता या योगा टिप्सबद्दल जाणून घेऊयात.

स्टॅमिना वाढवण्याचा योग

बालासन

Balasana
BalasanaSaam Tv

जेव्हा जेव्हा आळस आणि थकवा दूर करण्याचा विचार येतो तेव्हा बालासन करा. शरीर निरोगी (Healthy) ठेवण्यासाठी आणि मनाला शांत ठेण्यासाठी हे आसन सर्वोत्तम आहे.

उत्कट कोणासन

Utkata Konasana
Utkata KonasanaSaam Tv

हे योगासन (Yogasan) केल्याने स्नायू मजबूत होतात. यामुळे पाय दुखण्यापासून देखील आराम मिळतो. यामुळे मनही नियंत्रणात राहते. हे तुमचे फोकस करण्याची क्रिया देखील सुधारते. यामुळे पाठदुखीपासूनही आराम मिळतो.

Yoga For Lazy people
Facial Yoga : चेहऱ्यावरील लाँग लास्टिंग ग्लोसाठी फायदेशीर ठरतील ही योगासने! आजच अवलंब करा

सेतुबंधासन

Setubandhasana
SetubandhasanaSaam Tv

हे योग आसन केवळ तुमच्या पेल्विक फ्लोर स्नायूंना बळकट करत नाही तर मासिक पाळीच्या (Menstruation) वेदना दरम्यान हे आसन केल्यास तुम्हाला बराच आराम मिळतो. या आसनामुळे तुमच्या हातातील कडकपणाही कमी होतो.

Yoga For Lazy people
Yoga Mistakes : योगा करताना या चुका करु नका, नाहीतर शरीराला होईल नुकसान

हनुमानासन

Hanumanasana
HanumanasanaSaam Tv

हे आसन केल्याने पाठीचा खालचा (हिप्स) भाग मजबूत होतो आणि तुमचे मनही शांत राहते. असे केल्याने शरीरातील सर्व वेदना दूर होतात. हे तुमचा स्टॅमिना देखील वाढवते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com