साफ-सफाई आणि सोप्या पद्धतीनं जेवण बनवायचं असेल तर आजकाल गृहिणी नॉन-स्टिक भांड्याचा वापर करतात. नॉन-स्टिक भांडे धुण्यासाठी सोपी असल्यानं महिला सर्रास नॉन स्टिक भांडे वापरतात. परंतु एका सर्वेक्षणातून नॉन स्टीक भांड्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नॉन-स्टिक भांड्याचा वापर आरोग्यसाठी घातक असून त्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वॉशिंग्टन एका रिपोर्टनुसार नॉन-स्टिक भांड्यामधील पदार्थ खाल्ल्यानं 'टेफ्लॉन फ्लू' सारखा गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. नॉन-स्टिक भांड्यातील कोटिंग्समुळे फ्लू सारख्या गंभीर आजाराला समोरं जाण्याची शक्यता एका रिपोर्टमधून समोर आली आहे. 2023 मध्ये नॉन-स्टिक भांड्यामुळे या आजाराचे 267 प्रकरणं समोर आले आहे.
टेफ्लॉन फ्लू आजार काय आहे?
टेफ्लॉन फ्लू या आजाराला पॉलिमर फ्यूम फीवर नावानं ओळखले जाते. गरम नॉन-स्टिक भांड्यामधून निघणाऱ्या धुरामुळं श्वास घेण्यास समस्या निर्माण होऊ शकते. नॉन स्टिक भांड्यांचं तापमान जास्त असल्यानं त्यात धूर अधिक होते आणि त्यामुळे आजार होण्याची शक्यता एका रिपोर्टमधून वर्तवण्यात आली आहे.
'टेफ्लॉन फ्लू' आजाराची लक्षणे
गरम नॉन-स्टिक भांड्यात पदार्थ बनवताना धूर होतो. या धुराच्या संपर्कात आलेल्यानं फ्लू सारखे आजार होण्याची शक्यता आहे. पुढील लक्षणे ही टेफ्लॉन फ्लूची आहेत.
डोकेदुखी
थंडी वाजणे
ताप
खोकला
उल्टी
अंगदुखी
'टेफ्लॉन फ्लू' आजारापासून वाचण्याचे उपाय
नॉन-स्टिकचे भांडे वापरताना भांड्याचे तापमान कमी ठेवावे.
जास्त तापमानात पदार्थ बनवायचे असल्यास नॉन-स्टिकऐवजी इतर भांड्यांचा वापर करावा.
तुमच्या स्वयंपाक घरात नेहमी हवा खेळती असायला हवी. ज्यामुळे भांड्यामध्ये होणारा धूर बाहेर निघण्यास मदत होईल.
जास्त वापर केलेले नॉन-स्टिक पॅनचा वापर टाळवा.
रिकामे नॉन-स्टिक भांडे गरम करणे शक्यतो टाळा.
भांड्यात आगोदर पदार्थ टाकूनच भांडे गरम करा.
नॉन-स्टिक भांड्याऐवजी इतर कास्ट आयरन सारख्या दुसऱ्या भांड्यांचा वापर करा.
ही काळजी घेऊन तुम्ही नॉन-स्टिक भांड्यांचा वापर केला तर तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागणार नाही.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.