आजकाल प्रत्येक घरामध्ये नॉन स्टीक भांडी असतात. ही भांडी जेवण बनवण्यासाठी सोप्पी आहेत. यामध्ये जेवण भांड्याला चिटकत नाही मात्र त्याचे आरोग्यावर फार गंभीर परिणाम होतात. नॉन स्टीकमधील भांड्यांपेक्षा मातीची भांडी आरोग्यासाठी चांगली आहेत.
नॅश्नल इंस्टीट्यूट ऑफ न्युट्रिशन (NIN) मार्फत नागरिकांसाठी काही गाइडलाइन्स आल्यात. यामध्ये मातीच्या भांड्यांचं महत्व सांगण्यात आलं आहे. तसेच त्याचे फायदे आणि उपयोग याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. मातीची भांडी नॉन टॉक्सीक असतात आणि त्यात कोणत्याही प्रकारचं केमीकल नसतं.
जेवणासाठी कोणती भांडी उत्तम
जेवण बनवण्यासाठी स्टिलची भांडी उत्तम आहेत. या धातूच्या भांड्यात तुम्ही जेवण शिजवू शकता आणि याच ताटांमध्ये जेवण खाऊ देखील शकता. यामध्ये जेवण व्यावस्थित शिजतं. जेवण शिजताना करपत नाही, शिवाय ही भांडी साफ करणे देखील सोप्प आहे. त्यामुळे जेवण बनवण्यासाठी चिनी माती, माती यांसह तुम्ही स्टिलची भांडी वापरू शकता.
नॉन स्टीक भांडी
नॉन स्टीक भांड्यांना टेफलोनचे आवरन असते. जेवण बनवताना तुमचं नॉन स्टीक भांडं जास्त तापलं असेल तर टेफलोन जळतं आणि त्याचा धूर होतो. हा धूर आपल्या फुफ्फुसांसाठी चांगला नसतो. त्यामुळे तज्ञांकडून जेवण बनवण्यासाठी या भांड्यांचा वापर करूनये असं म्हटलं जातंय.
मातीच्या भांड्यांचा उपयोग
निसर्गापासून बनलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. मातीच्या भांड्यांमध्ये पदार्थ फार छान शिजतात. यात मातीमधील जिवनसत्व देखील पदार्थात उतरतात. त्याने पदर्थाची चव वाढते आणि जेवण रुचकर लागतं. तसेच मातीच्या भांड्यात पदार्थ दिर्घकाळ राहतात. लवकर खराब होत नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.