How to Keep Water Cold in Pot : माठात पाणी थंड होत नाही? फॉलो करा टिप्स

How to Keep Water Cold in Pot News : आजही अनेक जण माठातील पाणी पिणे पंसत करतात. पण अनेकदा माठातील पाणी थंड राहत नाही. त्यामुळे माठातील पाणी थंड करण्यासाठी टिप्स फॉलो करू शकता.
Water Cold in Pot
Water Cold in Pot Google
Published On

How to Keep Water Cold in Matka :

आजही अनेक जण माठातील पाणी पिणे पंसत करतात. पण अनेकदा माठातील पाणी थंड राहत नाही. त्यामुळे माठातील पाणी थंड करण्यासाठी टिप्स फॉलो करू शकता.

नव्या माठात सुरुवातील एक ते दोन आठवड्यात पाणी थंड राहतं. पण मडके जुनं होते, तेव्हा पाणी लवकर थंड होत नाही. त्यामुळे माठातील पाणी थंड करण्यासाठी काही टिप्स फॉलो करून उपयोगात आणू शकता.

Water Cold in Pot
Custard Falooda Recipe: उन्हाळ्यात मिळेल थंडावा, घरीच बनवा कस्टर्ड फालूदा, रेसिपा वाचा

मातीच्या भांड्याचा वापर करा

मातीचं माठ लोक हे किचन स्लॅबवर ठेवतात. किचनची लादी गरम झाल्यानंतर माठातील पाण्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे माठातील पाणी थंड होत नाही. त्यामुळे माठाखाली एखादं मातीचं भांडं ठेवा. माठाखाली मातीचे भांडे ठेवल्यास पाणी थंड होण्यास मदत होईल.

ओल्या कपड्याची मदत घ्या

माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी ओल्या कपड्याची मदत घेऊ शकता. माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी सुती कपडा पाण्यामध्ये भिजवावा. त्यानंतर तो कपडा माठाला गुंडाळून ठेवावा. कपडा हा ओलाच राहिला पाहिजे. कपड्यातील ओलावा कमी झाल्यास त्याला पुन्हा एकदा भिजवावा. यामुळे मडक्यातील पाणी थंड राहते.

Water Cold in Pot
Lips Care Tips : उन्हामुळे ओठ काळवडंले? या टिप्स फॉलो करा, काळपटपणा होईल दूर!

कोणत्या प्रकारचं मडके खरेदी कराल?

माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी खरेदी करण्यासाठी काही बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. माठातील पाणी थंड राहण्यासाठी मडके थोडे वाजवून पाहावे. माठ मजबूत असेल तर त्याचा आवाज जास्त येतो. या प्रकारच्या माठात पाणी ठेवल्यास पाणी थंड राहते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com