Custard Falooda Recipe: उन्हाळ्यात मिळेल थंडावा, घरीच बनवा कस्टर्ड फालूदा, रेसिपा वाचा

Custard Falooda Recipe in Marathi: उन्हाळा सुरू झाला की, कुल्फी, आईस्क्रिम आणि फालूदा खाण्याची इच्छा होते. लहान मुले असोत की प्रौढ, सर्वांना उन्हाळ्यात फालुदा, कुल्फी आणि आईस्क्रीम खायला आवडते. दुकांनामध्ये देखील हे पदार्थ खाण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते.
Custard Falooda Recipe
Custard Falooda RecipeSaam Tv

Custard Falooda Ingredients and Process:

उन्हाळा सुरू झाला की, कुल्फी, आईस्क्रिम आणि फालूदा खाण्याची इच्छा होते. लहान मुले असोत की प्रौढ, सर्वांना उन्हाळ्यात फालुदा, कुल्फी आणि आईस्क्रीम खायला आवडते. दुकांनामध्ये देखील हे पदार्थ (Food) खाण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते.

सध्या उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. उन्हाळाच्या दिवसात अनेकांना थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. उन्हाळ्यात थंड पदार्थ खाल्ल्याने शरीराला थंडावा वाटतो. यामध्ये कस्टर्ड देखील एक अतिशय लोकप्रिय आहे. वर्मीसेली कस्टर्ड फालुदा लोकप्रिय आहे. घरच्याघरी अत्यंत कमी वेळात वर्मीसेली कस्टर्ड कसा बनवायचा हे जाणून घ्या

Custard Falooda Recipe
Raw Mango Recipe: उन्हाळ्याच्या दिवसात कैरीपासून बनवा ५ चविष्ट पदार्थ

कस्टर्ड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 • तूप

 • शेवया

 • दूध

 • दूध पावडर

 • कस्टर्ड पावडर

 • काजू बदाम

 • साखर

 • फळे इत्यादी

कस्टर्ड बनवण्याची रेसिपी

 • सर्वप्रथम एका कढईत तूप घालून ते गरम करून त्यात शेवया तळून घ्या.

 • या शेवयामध्ये दूध घालून त्या शिजवून घ्या.

 • दुसरीकडे एका दुधाच्या पेल्यात कस्टर्ड पावडर मिसळा यानंतर दूध पावडर घालून सर्वकाही मिश्रण करा.

Custard Falooda Recipe
Coconut Chutney Recipe : साउथ इंडियन स्टाइलने बनवा खोबऱ्याची चटणी, रेसिपी पाहा
 • आता हे सर्व मिश्रण शेवयामध्ये मिक्स करून पाच ते सहा मिनिटांसाठी उकळून द्या.

 • थोडी साखर घालून या मिश्रणाला चांगले शिजवून घ्या.

 • मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून थोडा वेळा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

 • थोड्यावेळाने एका ग्लासमध्ये सब्जा, फळांचे काप नंतर थंड कस्टर्ड शेवयाचे मिश्रण घाला शेवटी बदामाचे तुकडे आणि डाळिंबाचे दाणे घालून गार्निश करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com