Shraddha Thik
आता हवामानात बदल होताना दिसत आहे. थंडी फक्त सकाळी आणि संध्याकाळी उरते. जिथे हिवाळ्यात त्वचा कोरडी राहते.
त्याचप्रमाणे उन्हाळ्यात घामाचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. त्यामुळे आतापासूनच त्वचेच्या काळजीसाठी या टिप्सचा अवलंब करा.
उष्ण तापमानामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल दिसू लागते. त्यामुळे चेहऱ्यावर चिकटपणा जाणवतो. म्हणून, तेल मुक्त उत्पादने वापरणे लक्षात ठेवा.
उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी बनवायची असेल तर या ऋतूत जास्त जड मेकअप करू नका. या हवामानात मेकअपमुळे त्वचा तेलकट होते.
उन्हाळ्यात स्किन केअर करताना तुम्ही लाईट प्रोडक्ट्स वापरा. जसे की, जेल बेस्ड क्लिंजर, सीरम, तसेच जेलयुक्त मॉइश्चरायझरचा वापर करा.
उन्हाळ्यात तुमच्या स्किनवर टोनर वापरा, स्किन हायड्रेटेड राहते. त्याच्या वापरामुळे त्वचा फ्रेश राहते.
हिवाळ्यामुळे बहुतेकजण पाणी कमी पितात. तसेच उन्हाळ्यात त्याचा परिणाम चुकिचा होतो. या मोसमात पाणी पिणे अत्यंत गरजेच आहे.