Earbuds Side effects : इअरबड वापरताय, वेळीच व्हा सावध! चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Earphone Side Effects : एअर फोन आणि इअरबडच्या वापरामुळे चेहऱ्याला लकवा मारत नाही. मात्र त्यांच्या अतिवापरामुळे अतिवापरामुळे कानदुखी, बहिरपेणा यासारखे आजार उद्भवू शकतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
Earbuds Side effects
Earbuds Side effectsSaam Digital
Published On

एअरफोन, इअरबड्स तुम्ही वापरत असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा..कारण, एअरफोनमुळे तुमच्या चेहर्‍याला लकवा मारू शकतो..चेहर्‍याला लखवा मारल्याने तोंड वाकडं होऊन बोलायला आणि जेवायलाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा दावा खरा आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. पण त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

एअरफोन, ईयरबडच्या अतिवापरामुळे चेह-याला लकवा मारू शकतो. एअरफोन अधिक वेळ वापरल्याने बहिरेपणा, डोकेदुखी, टेन्शन, हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. हा दावा केल्याने याची पडताळणी करणं गरजेचं आहे... प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने या दाव्याबाबत खरं काय हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल टीमने डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि एअरफोनमुळे चेहर्‍याला लखवा मारू शकतो का हे जाणून घेतलं...

पडताळणीत काय सत्य समोर आलं?

एअर फोन आणि इअरबडच्या वापरामुळे चेह-याला लकवा मारत नाही

हेडफोन, इअरबडच्या अतिवापरामुळे कानाचे त्रास होतात

कानदुखी, बहिरपेणा येणं, कानाचा एकाबाजूला भाग दुखणे

टेन्शन, डोकं दुखणे असे परिणाम जाणवतात

कानात फंगस होणे यासारखे आजार होऊ शकतात

Earbuds Side effects
Maharashtra Politics : बाप-लेकांमध्ये राजकीय आखाडा; दोन्ही राष्ट्रवादीत वडिलांविरोधात मुलांनी ठोकले शड्डू

एअरफोन वापरताना काय काळजी घ्यावी?

कमीत कमी वेळ हेडफोन किंवा एअरफोनचा वापर करावा

एअरफोनचा आवाजात कमी ठेवावा

एअरबड्स कानात व्यवस्थित बसणारे वापरावेत

एअरबड, एअरफोन हे जास्त वापरल्याने त्याचे गंभीर परिणाम जाणवतात. त्यामुळे त्याचा वापर कमी प्रमाणात करावा. कोरोना काळात ऑनलाईन काम करताना बरेचजण एअरफोन वापरत होते. त्यामुळे १० पैकी २ जणांना कानाचा त्रास जाणवत होता. एअरफोनचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे गरजेपुरताच एअरफोनचा वापर करा.

Earbuds Side effects
Sassoon Hospital : 'ससून'चा आणखी एक कारनामा; डॉक्टरच उठला रुग्णांच्या जीवावर, 'साम'च्या बातमीनंतर डॉक्टरचं निलंबन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com