Cancer Saam tv
लाईफस्टाईल

Rising cancer cases: अनहेल्दी लाइफस्टाइल ठरतेय जबाबदार; भारतात २० टक्क्यांपेक्षा जास्त तरूण कॅन्सरग्रस्त

sedentary lifestyle cancer young Indians: कर्करोग हा एकेकाळी वृद्ध लोकांचा आजार मानला जात होता, परंतु भारतामध्ये आता २० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, कोलन कॅन्सर यांसह अनेक प्रकारच्या कॅन्सरचे रूग्ण आता दिसून येतात. विशेषतः ४० वर्षांखालील तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचताना दिसतंय. कॅन्सरमुक्त भारत या संस्थेच्या अलीकडील अभ्यासानुसार, देशातील कॅन्सरच्या रुग्णांपैकी ६० टक्के पुरुष आणि ४० टक्के महिला या आजाराने ग्रस्त आहेत. तर २० टक्के तरूणांना कॅन्सर होत असल्याचं समोर आलंय.

कॅन्सर वाढण्यामागील मुख्य कारणं

कॅन्सरच्या वाढत्या घटनांमागे अनेक घटक कारणीभूत आहेत पण त्यातील सर्वात मोठं कारण म्हणजे बदलती जीवनशैली. विशेषतः शहरी भागात राहणाऱ्या लोकांचं जीवन झपाट्याने बदलताना दिसतंय. सतत धावपळ, तणाव आणि वेळेचा अभाव यामुळे शरीर आणि मनावर परिणाम होतो.

अस्वस्थ आहार आणि वेळेचा अभाव

शहरांमध्ये लोकांना शांतपणे जेवायला वेळ मिळत नाही. चुकीच्या वेळेवर जेवण, जंक फूड आणि प्रोसेस्ड पदार्थांचे वाढतं सेवन यामुळे कोलेस्ट्रॉल, अनहेल्दी फॅट, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा वाढतो. हे सगळे घटक शरीराला हानी पोहोचवतात आणि कॅन्सरचा धोका वाढवतात.

अनियमित कामाची सवय

कॉर्पोरेट ऑफिसमधील अनहेल्दी वर्क कल्चर देखील कॅन्सरच्या वाढीला कारणीभूत आहे. दिवसभर स्क्रीनसमोर बसून काम केल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते आणि शरीर कॅलरी बर्न करत नाही. योगा आणि व्यायामासाठी वेळ नसणं, शून्य शारीरिक श्रम, यामुळे मेटाबॉलिझम कमी होतो आणि इम्यून सिस्टम कमजोर होते. परिणामी, ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, पॅन्क्रियाटिक कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

वाढतं प्रदूषण एक गंभीर समस्या

भारतामध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. राजधानी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक मानली जाते. याठिकाणची हवा आणि पाणी कार्सिनोजेनिक घटकांनी भरलेले असतात. हे पोल्यूटंट्स शरीरात जाऊन कॅन्सर निर्माण करणाऱ्या प्रक्रिया सुरू करतात. शहरांमध्ये तरुण लोकसंख्या अधिक असून त्यांची जीवनशैलीही अस्वस्थ असते, त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण त्यांच्यात अधिक दिसून येतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम

एवढीशी जरी शंका असती तर... फलटण आत्महत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वपूर्ण विधान|VIDEO

Heavy Rain : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार; शेतीचे मोठे नुकसान

Mumbai To Phaltan Travel: मुंबईवरून सातारा फलटणपर्यंत प्रवास कसा कराल? वाचा सोपे मार्ग आणि टिप्स

साताऱ्यानंतर अमरावतीत उच्चशिक्षित तरूणीचा आढळला मृतदेह; राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT