Heart Blockage: हार्टमध्ये ब्लॉकेज आहेत का हे जाणून घ्या घरबसल्या, एकही पैसा खर्च न करता मिळवा अचूक माहिती

भारतात तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण झपाट्याने वाढत असून घरच्या घरी तुम्हाला हार्टमध्ये ब्लॉकेज आहेत का हे समजून घेता येणार आहे. यासाठी कोणत्या ३ टीप्स आहेत ते पाहूयात
Heart artery blockage signs
Heart artery blockage signssaam tv
Published On

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागलेत. भारतात तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय. मुळात याची लक्षणं दिसून येतात मात्र ती सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जेव्हा ही लक्षणं समजून येतात त्यावेळी फार उशीर झालेला असतो.

हृदयातील ब्लॉकेज कोणताही मोठा इशारा देत नाही. हा धोका ओळखायचा असेल तर छातीत जडपणा, जिना चढताना श्वास लागणं, काहीही न करता थकवा जाणवणं अशी लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं आपण घरबसल्या ओळखू शकतो. हृदयामध्ये असलेले ब्लॉकेज घराच्या घरी ओळखण्याच्या काय पद्धती आहेत ते पाहूयात.

Heart artery blockage signs
Cancer: सायलेंट किलर मानले जातात 'हे' ४ कॅन्सर; कोणत्याही लक्षणाशिवाय शरीर पोखरतात, वेळीच बदल ओळखा

डॉक्टरांप्रमाणे नाडी तपासा

  • शांतपणे बसा. टीव्ही नाही, फोन नाही. एक मिनिट फक्त स्वतःला द्या.

  • हाताच्या मनगटावर (जिथे घड्याळ घालतो तिथे) दोन बोटं ठेवा. अंगठा वापरू नका. नाडीचा ठोका जाणवा.

  • ६० सेकंदात किती ठोके आहेत ते मोजा. अंदाज न लावता प्रत्यक्ष मोजा.

  • सामान्य हृदयाचा ठोका विश्रांतीच्या स्थितीत प्रतीमिनिट ६० ते १०० वेळा असतो. पण गतीपेक्षा लय महत्त्वाची असते. ठोका नियमित आहे का? तबल्याप्रमाणे आहे ते पाहा.

Heart artery blockage signs
Pancreatic Cancer Symptoms: पायांमध्ये 'हे' बदल दिसले तर समजा स्वादुपिंडाचा कॅन्सर झालाय; लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

दोन मजले चढण्याची टेस्ट

तुमच्या इमारतीत दोन मजले चढा. न धावता, ना एकदम संथ गतीने. अगदी नेहमी चढता तसे चढा

तीन गोष्टी लक्षात ठेवा:

  • श्वास किती जोरात लागतो?

  • छातीत जडपणा किंवा दडपण वाटतंय का?

  • दोन मजले चढूनच थकलात का?

आरोग्यदायी हृदय दोन मजले सहज चढू शकतं. थोडा श्वास लागेल, पण मॅरेथॉन धावल्यासारखा नाही.

Heart artery blockage signs
Brain Tumor Awareness : डोकेदुखीमागे मेंदूचा ट्युमर असू शकतो का? वेळीच ओळखा लक्षणं अन्यथा...

रोजच्या लक्षणांकडे लक्ष द्या

  • शरीर सतत संकेत देतं, पण आपण दुर्लक्ष करतो.

  • दररोज स्वतःकडे लक्ष द्या

  • श्वास लागणं: कपडे घालताना, स्वयंपाकघरात चालताना दम लागतो. पूर्वी सहज होतं ते आता कठीण वाटतं.

  • सतत थकवा: ८ तास झोपूनही थकल्यासारखं वाटतं. साधं कामही दमायला होतं. हा सामान्य थकवा नाही हृदय रक्त पंप करण्यात अडचणीत आहे.

  • सूज: संध्याकाळी पाय, टाचा फुगतात. अंगठ्या घट्ट वाटतात. सकाळी चेहरा फुगलेला दिसतो.

Heart artery blockage signs
Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

तात्काळ डॉक्टरांची मदत कधी घ्यावी?

  • तुम्हाला खालील लक्षणं दिसत असतील तर कार्डिओलॉजिस्टकडे तात्काळ जा:

  • छातीत वेदना ५ मिनिटांपेक्षा जास्त जाणवत असेल

  • छातीत दडपणासोबत घाम येतो

  • वेदना जबड्यात, खांद्यात किंवा हातात पसरते

  • वडील किंवा भावाला ५० वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता

  • तुम्हाला मधुमेह किंवा हाय ब्लड प्रेशर असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com