Type 2 diabetes saam tv
लाईफस्टाईल

Type 2 diabetes: टाईप 2 मधुमेहींनी डॉक्टरांना 'हे' प्रश्न जरूर विचारावेत; डॉक्टरांकडे भेटण्यापूर्वी जाणून घ्याच

How to manage type 2 diabetes: अनेक मधुमेही रुग्ण डॉक्टरांकडे जातात तेव्हा त्यांना नेमके काय विचारावे, हे कळत नाही. केवळ औषधे घेऊन परत येणे पुरेसे नाही.

Surabhi Jayashree Jagdish

  • टाईप 2 डायबिटीजवर नियंत्रणासाठी सातत्य गरजेचे आहे.

  • रक्तातील साखर नियमित तपासली पाहिजे.

  • साखर अचानक वाढल्यास त्वरित उपाय करावेत.

टाईप 2 डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजची काळजी घ्यावी लागतं. त्याचबरोबर डॉक्टरांशी घट्ट नातं ठेवणंही गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी जसं की वजन कमी करणं, आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात आणि त्यासाठी डॉक्टर आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात.

डायबिटीज नीट व्यवस्थापित व्हावा यासाठी डॉक्टरांना नियमित भेटणं, प्रश्न विचारणं आणि शंका दूर करणं खूप महत्त्वाचं आहे. अशावेळी अनेकदा रूग्णांना डॉक्टरांना नेमकं काय विचारलं पाहिजे हे लक्षात येत नाही. आज तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना कोणते प्रश्न विचारले पाहिजे ते पाहूयात.

रक्तातील साखर किती वेळा तपासावी?

डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्तातील साखर तपासणं महत्त्वाचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जेवणानंतर तपासणी करावी लागते. काही लोकांना आठवड्यातून एकदाच तपासणं पुरेसं असतं.

साखर अचानक वाढली तर काय करावं?

कधी कधी रक्तातील साखर अचानक खूप वाढते. अशावेळी काय करावं हे माहित असणं गरजेचं आहे. डॉक्टरांकडून तात्पुरत्या उपायांची माहिती घ्यावी. काही उपाय असे असू शकतात-

  • इन्सुलिनचा डोस कसा काढावा हे शिकणं

  • इन्सुलिन किंवा इतर औषधं सुरू करणं

  • जेवणानंतर थोडं चालणं

ओझेम्पिक किंवा माउंजरो घ्यावं का?

आजकाल डायबिटीजसाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत जी फक्त साखरेवरच नव्हे तर हृदय आणि किडनीच्या आरोग्यावरही चांगला परिणाम करतात. ओझेम्पिक आणि माउंजरो सारखी GLP-1 औषधं वजन कमी करण्यास मदत करतात आणि किडनीद्वारे जादा ग्लुकोज बाहेर टाकण्याचं काम करतात.

लसीकरण का महत्त्वाचं?

डायबिटीज असलेल्या लोकांना फ्लू, कोविड किंवा न्यूमोनिया सारख्या संसर्गांमुळे गंभीर त्रास होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन सर्व शिफारस केलेल्या लसी वेळेवर घेणं आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.

व्यायाम कसा करावा?

नियमित व्यायाम डायबिटीजसाठी खूप फायदेशीर ठरतो. यामुळे वजन कमी होतं, रक्तदाब आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो, तसेच इन्सुलिन योग्यरीतीने काम करतं. व्यायामाच्या आधी आणि नंतर आहार किंवा औषधांमध्ये कोणते बदल करायचे याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

औषधं काम करतायत का कसं कळेल?

A1C चाचणीमुळे डॉक्टरांना औषधं योग्य आहेत की नाही हे समजतं. शिवाय रोजच्या साखरेचं रेकॉर्ड, औषधांचे दुष्परिणाम याबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी. प्रत्येक भेटीत औषधं बदलायची गरज आहे का हे तपासून घ्यावं.

डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी किती वेळा साखर तपासावी?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून एकदा किंवा अधिक वेळा तपासावी.

साखर अचानक वाढल्यास काय करावे?

इन्सुलिन डोस, थोडं चालणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ओझेम्पिक आणि माउंजरो औषधांचा काय फायदा आहे?

ही औषधे वजन कमी करतात आणि किडनीच्या आरोग्यास मदत करतात.

डायबिटीज रुग्णांनी लसीकरण का करून घ्यावे?

संसर्गांपासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.

व्यायामाच्या वेळी आहारात काय बदल करावेत?

व्यायामापूर्वी आणि नंतरचा आहार डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

SCROLL FOR NEXT