Supermassive Black Hole Merger saam tv
लाईफस्टाईल

Supermassive Black Hole Merger: एकमेकांच्या समोर येणारेत दोन महाभयानक ब्लॅक होल्स; पहिल्यांदा दिसणार आश्चर्यकारक दृश्य

Supermassive Black Hole Merger: येत्या काळात २ ब्लॅक होल्स एकमेकांमध्ये विलीन होणार असल्याची माहिती अंतराळवीरांनी दिलीये. हे ब्लॅक होल्स दोन आकाशगंगाच्या मध्यस्थानी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ब्लॅक होलबाबत आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल. अशातच आता अंतराळवीरांनी एक सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल्सच्या दोन जोड्यांचा शोध लावला आहे. दरम्यान हे ब्लॅक होल्स एकमेकांमध्ये विलीन होणार असल्याची माहिती अंतराळवीरांनी दिलीये. अनेक अहवालांनुसार, ब्रम्हांडामध्ये घडणारी ही पहिलीच घटना असणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, हे ब्लॅक होल्स दोन आकाशगंगाच्या मध्यस्थानी आहे. या गोष्टीची माहिती NASA च्या CHANDRA X-Ray ऑब्जर्वेटरीच्या मदतीने मिळाली. वैज्ञानिकांच्या मते, आपल्याला ब्रह्मांडाची निर्मिती आणि सुरुवातीच्या काळात आकाशगंगांच्या उत्क्रांतीबाबत मदत मिळणार आहे.

प्रत्येक Dwarf galaxy च्या केंद्रामध्ये २-२ ब्लॅक होल्स

चंद्रा एक्स-रे ऑब्जर्वेटरीने २ Dwarf galaxy चा फोटो घेतला आहे. ज्यांची नावं Mirabilis आणि Elstir & Vinteuil आहे. Mirabilis ही आपल्या आकाशगंगेच्या 760 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असल्याची माहिती आहे. याशिवाय प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रस्थानी दोन सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल असतात.

ज्यावेळी एखादा पदार्थ ब्लॅक होलच्या आत जातो, त्यावेळी त्याच्याभोवती अत्यंत गरम प्लाझ्माचा थर बनतो. चंद्रा ऑब्जर्वेटरीने ब्लॅक होल्सच्या या डिस्कमधून येणारे एक्स-रे उत्सर्जन पाहिले. या संशोधनामुळे आपल्याला हे समजण्यास मदत मिळणार आहे की, आकाशगंगा कशा पद्धतीने विकसीत होणार आहे.

या संशोधनातून काय आलं समोर?

संशोधकांनी केलेल्या या अभ्यासामधून समोर आलंय की, आपल्या आकाशगंगेसारख्या महाकाय आकाशगंगा कशा तयार झाल्या. ॲस्ट्रोफिजिकल जर्नल आणि ArXiv मध्ये या संशोधनाचा रिसर्च पेपर प्रकाशित करण्यात आला आहे.

असं मानलं जातं की, Dwarf galaxyच्या विलीनीकरणानेच मोठ्या आकाशगंगा तयार होतात. Dwarf galaxy मध्ये काही अब्ज तारे असतात.

या रिसर्चच्या सह-लेखिका ब्रेना वेल्स यांच्या मते, 'आधीच्या विश्वातील बहुतेक Dwarf galaxy आणि ब्लॅक होल्स वारंवार विलीन झाल्यामुळे कदाचित आता आकाशगंगा खूप मोठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

SCROLL FOR NEXT