Asteroid coming near earth saam tv
लाईफस्टाईल

आज पृथ्वीवर आदळणार २ लघुग्रह; मानवाचं अस्तित्व धोक्यात? NASA ही अलर्ट मोडवर

Asteroid coming near earth: 3 जानेवारी रोजी म्हणजेच आज 2024 YC9 आणि 2024 YL1 हे दोन लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. हे दोन्ही ग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

अंतराळात अनेक लघुग्रह असतात. अंतराळातील दगडांना लघुग्रह असं म्हटलं जातं. मात्र आज एक लघुग्रह पुन्हा एकदा पृथ्वीजवळून जाणार आहेत. 3 जानेवारी रोजी म्हणजेच आज 2024 YC9 आणि 2024 YL1 हे दोन लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. हे दोन्ही ग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येणार आहे.

नासाचे शास्त्रज्ञ लक्ष ठेऊन

दरम्यान हे लघुग्रह किती नुकसान करणार यासाठी नासासह जगभरातील शास्त्रज्ञ या लघुग्रहांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे या लघुग्रहावर शास्त्रज्ञ प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवून आहेत. या लघुग्रहांना पृथ्वीसाठी धोकादायक आहेत असं मानलं जातंय. जर ते पृथ्वीवर आदळले तर नक्कीच विनाश होऊ शकतो. मात्र, हे दोन्ही लघुग्रह पृथ्वीवर धडकणार नाहीत, ही दिलासादायक माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

3 जानेवारी रोजी पृथ्वीजवळून जाणारा पहिला लघुग्रह 2024 YC9 असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लघुग्रहाचा आकार 44 फूट आहे आणि तो एका घराप्रमाणे आहे. सकाळच्या वेळेस हा ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. या वेळी त्याचं पृथ्वीपासूनचे अंतर 1310000 किलोमीटर असणार आहे. या लघुग्रहाचा वेग ताशी 31 हजार किलोमीटरपेक्षा जास्त असेल.

३ जानेवारीला पृथ्वीजवळून जाणाऱ्या दुसऱ्या लघुग्रहाचं नाव 2024 YL1 आहे. हा लघुग्रह पहिल्यापेक्षा किंचित लहान आहे. मात्र त्याचा आकार देखील 38 फूट आहे. हा लघुग्रह रात्री 11.33 वाजता ते पृथ्वीपासून 2,360,000 किलोमीटर अंतरावरून वेगाने पुढे जाणार आहे. यावेळी त्याचा वेग 17,221 किलोमीटर प्रति तास असणार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही लघुग्रहांपासून पृथ्वीला कोणताही धोका नाही.

नासाने या लघुग्रहांना ट्रॅक करण्यासाठी एक जेट प्रोपल्शन प्रयोगशाळा तयार केलीये. त्याच्या रडारच्या मदतीने पृथ्वीजवळून जाणाऱ्या लघुग्रहांवर जवळपास दररोज लक्ष ठेवलं जातं. हे लघुग्रहांसंबंधीच्या पुढच्या अभ्यासासाठी मदत करतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT