Tulsi Leaves For Hair Saam tv
लाईफस्टाईल

Tulsi Leaves For Hair : सतत गळणाऱ्या केसांची होईल सुट्टी! कोंड्याला करा कायमचे बाय बाय; अंगणातली तुळस ठरेल फायदेशीर

Hair Falls Dandruff Issue : प्रदूषण, धूळ आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्या केसांवर अधिक परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Hair Falls Problem :

आयुर्वेदात असे अनेक औषधी पदार्थ आहेत ज्याचा वापर करुन आपण आरोग्याची निगा राखू शकतो. हल्ली बहुतांश तरुणांमध्ये केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रदूषण, धूळ आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्या केसांवर अधिक परिणाम होतो.

कितीही महागडे उत्पादन केसांसाठी वापरले तरी कोंडा, केस पिकणे आणि केसगळती यापासून आपली सुटका काही होत नाही. अशावेळी फायदेशीर ठरेल ती तुळशी. आयुर्वेदात तुळशीला अधिक महत्त्व आहे. केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी त्याच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. जाणून घेऊया केसांना दाट आणि मजबूत करण्यासाठी तुळशीची पाने कशी फायदेशीर ठरतील ते.

1. तुळशी आणि मध हेअर पॅक

तुळशीत (Tulsi) असणारे गुणधर्म केसांसाठी अधिक फायदेशीर आहेत. याचा हेअर पॅक सहज घरी सहज बनवू शकता. यासाठी तुळशीची 10-12 पाने आणि एक चमचा मध घ्यावे लागेल. हेअर (Hair) पॅक बनवण्यासाठी आधी तुळशीची पाने धुवा. आता बारीक वाटून घ्या. थोडे पाणी घालून पेस्ट पातळ करा. आता त्यात एक चमचा मध घाला. हा पॅक केसांना २० मिनिटे लावा. नंतर पाण्याने धुवा.

2. तुळस आणि नारळाचे दूध

हा हेअर पॅक बनवण्यासाठी तुळशीची पेस्ट बनवा. आता नारळाच्या दुधात मिसळा. हे मिश्रण उकळून घ्या, थंड झाल्यावर केसांना लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर धुवा.

3. तुळस आणि खोबरेल तेल

हा पॅक केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. पॅक बनवण्यासाठी तुळशीची पाने धुवून वाळवा. एका भांड्यात खोबरेल तेल (Oil) घ्या, त्यात आवळा पावडर आणि तुळशीची पाने घालून उकळवून घ्या. हे तेल थंड झाल्यावर स्वच्छ डब्यात साठवा. या तेलाने तुम्ही दररोज केसांना मसाज करू शकता.

4. केसांसाठी तुळशीचे फायदे

  • तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात, जे टाळूला हायड्रेट करण्यास मदत करतात.

  • तुळशीच्या वापरामुळे केसांची वाढ जलद होते. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठीही ही पाने गुणकारी आहेत.

  • केस स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तुळशीचे तेल वापरू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

SCROLL FOR NEXT