Left Over Rice Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Left Over Rice Recipe : मुलं पिझ्झा-बर्गर खाणं विसरून जातील; घरच्याघरी रात्री उरलेल्या पदार्थांपासून बनवा ही यम्मी रेसिपी

Yummy Recipes : रात्रीचा उरलेला शिळा भात फेकून देण्याऐवजी घरीच बनवा ही खास आणि स्पेशल रेसिपी.

Ruchika Jadhav

लहान मुलांची जेवणाच्या बाबतीत फार नाटकं असतात. त्यांना आवडीचे आणि चमचमीत पदार्थच खावे वाटतात. रोज पिझ्झा किंवा बर्गर तसेच बाहेरचे कुरकुरे आणि वेफर्स असे पदार्थ खाणे मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे. असे पदार्थ खाल्याने मुलांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे मुलांना रोज हेल्दी आणि चमचमीत असं काय खाण्यासाठी द्यावं असा प्रश्न प्रत्येक आईच्या मनात फिरत असतो.

मुलांच्या जेवणाची आणि स्नॅक्सची हिच चिंता मिटवत आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी आणली आहे. ही रेसिपी अत्यंत सोपी आहे. यामध्ये तुम्हाला रात्रीच्या उरलेल्या शिळ्या जेवणापासून एक युनिक पदार्थ बनवण्याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग लगेचच जाणून घेऊयात हेल्दी रेसिपी.

साहित्य

रात्रीचा भात - १ कप

बटाटे - २

हिरवी कोथिंबीर

मीठ

मिरची

बेकींग सोडा

कृती

सर्वात आधी एका मिक्सरमध्ये रात्रीचा उरलेला भात बारीक करून घ्या. भाताची छान थिक पेस्ट तयार करा. त्यानंतर यामध्ये दोन उकडलेले बटाटे मिक्स करा. बटाटे अगदी मऊवार उकडवून घ्यायचे आहेत. बटाटे मिक्स केल्यावर पुढे यात हिरवी कोथिंबीर मिक्स करा. तसेच मीठ आणि मिरची त्यासह थोडासा बेकींग सोडा मिक्स करा. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.

मिश्रण छान एकजीव झालं की ते १० मिनिटे तसेच झाकून ठेवा. तसेच पुढे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात थोडे थोडे करून भज्यांप्रमाणे या पिठाचे गोळे तेलाच सोडा आणि छान गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत मस्त तळून घ्या. अशा पद्धतीने बनवलेली ही रेसिपी तुम्ही टोमॅटो केचपसह मुलांना खाण्यासाठी देऊ शकता.

लहान मुलांना ही रेसिपी फार आवडेल. तसेच मुलांना बाहेरील फास्ट फूड खाण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही ही डिश घरी हमखास बनवू शकता. या तुम्ही तुमच्या आवडीनुसार विविध भाज्या सुद्धा मिक्स करू शकता. त्यामुळे हा पदार्थ अगदी चविष्ट लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेत करिअर करायचंय? मग 'हे' १० फुलफॉर्म जाणून घ्या

Maharashtra Live News Update : भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं - नवनाथ वाघमारे

Diwali Car Offers: दिवाळी बंपर ऑफर; 'या' टॉप सेडान कारवर तब्बल २.२५ लाखांची सूट

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

SCROLL FOR NEXT