Bhakarwadi Recipe : चितळे स्टाईल अस्सल मऊ आणि खुसखुशीत बाकरवडीची रेसिपी; स्वाद चाखताच म्हणाल वाहा

Bhkarwadi Making Tips : दुकानात आणि हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच बाकरवडी घरच्याघरी कशी बनवतात? याचीच सिंपल रेसिपी आज जाणून घेणार आहोत.
Bhakarwadi Making Tips
Bhakarwadi RecipeSaam TV
Published On

चितळे स्टाईल बारकरवडी प्रत्येकाला आवडते. मात्र त्यांच्यासारखी अगदी परफेक्ट रेसिपी आजवर कुणालाही जमलेली नाही. अशात आज आम्ही तुमच्यासाठी कुरकुरीत बाकरवडीची रेसिपी आणली आहे. या स्टेप्सने तुमची रेसिपी अगदी परफेक्ट तयार होईल. त्यामुळे यासाठी लागणारे साहित्य आणि त्याचे प्रमाण योग्य असले पाहिजे. चला तर मग रेसिपी जाणून घेऊ.

Bhakarwadi Making Tips
Vada Pav Recipe: १० मिनिटांत बनवा मुंबईचा स्ट्रीट स्टाईल वडापाव; सोपी रेसिपी वाचा

साहित्य

१ कप मैदा

१ चमचा बेसन

१ बारीक चमचा हळद

अर्धा चमचा हिंग

चविनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

पाणी

मसाल्यासाठी साहित्य

सुकं खोबरं

धने

जीरे

सफेद तीळ

खसखस

हळद

लाल तिखट

हिंग

आमचूर पावडर

साखर

मीठ

कृती

कणीक मळण्यासाठी सर्वात आधी मैदा, बेसन, हळद, हिंग, मीठ एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर यामध्ये अगदी एक चमचाभर तेल मिक्स करा. तेल तुम्हाला गरम करून मिक्स करायचं आहे. म्हणजे तेलाचं मोहन मिक्स करायचं आहे. तेलाचं मोहन टाकल्यानंतर ते गरम असतं. त्यामुळे गरम तेल पिठात टाकल्यावर ते चमच्याने आधी छान मिक्स करून घ्या. मिश्रण स्पर्श करण्याइतकं थंड झाल्यावर ते हाताने छान मळून घ्या. पीठ मळताना तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. थोडं थोडं पाणी घेऊन पिठाची मस्त कणीक तयार होईल.

पुढे मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी सुकं खोबरं बारीक करून घ्या. त्यात धने, जीरे, सफेद तीळ, खसखस, हळद, लाल तिखट, हिंग, आमचूर पावडर, साखर आणि मीठ मिक्स करा. हे मिश्रण बारीक झाल्यावर एका वाटीत काढून ठेवा.

त्यानंतर पिठाची एक मस्त चपाती लाटून घ्या. चपाती लाटल्यावर त्याच्या जास्तीच्या कडा कापून चौकोनी आकार करून घ्या. त्यानंतर यामध्ये तयार मसाला भरून घ्या. मसाला भरून झाल्यावर या चपातीचा बारीक रोल बनवून घ्या. त्यानंतर त्याचे बारीक काप करून घ्या. बारीक काप केल्यावर कडक तेलात मंद आंचेवर सर्व बाकरवडी तळून घ्या. अशा पद्धतीने तयार होईल तुमची खास आणि भन्नाट बाकरवडी रेसिपी.

ही बाकरवडी तुम्ही एका दिवसात सुद्धा फस्त करू शकता. तसेच बाकरवडी जास्त दिवस टिकून रहावी म्हणून ती हवा बंद डब्ब्यात भरून ठेवा. अशा पद्धतीने बनवलेली बाकरवडी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडेल. तुम्ही नवीन स्वयंपाक शिकण्यास सुरुवात केली असेल तरी देखील तुम्ही ही बाकरवडी अगदी झटपट बनवू शकता.

Bhakarwadi Making Tips
Kolhapur Food Culture : कोल्हापूरची चव लय भारी! तांबडा-पांढरा रश्शासोबत करा झणझणीत पदार्थांची मेजवानी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com