महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. कोल्हापूर महाराष्ट्राची शान आहे. हे महाराष्ट्रातील लोकप्रिय शहर आहे. कोल्हापूर शहर त्याच्या इतिहासामुळे आणि पारंपारिक संस्कृतीमुळे पर्यटकाचे लक्ष वेधून घेते.
पर्यटकांना कोल्हापूरला भेट दिल्यावर अनेक गोष्टी एक्सप्लोर करायला मिळतील. निसर्गाच्या सानिध्यात असलेले कोल्हापूर शहर त्याच्या खाद्य संस्कृतीसाठी (Kolhapur Food Culture) प्रसिद्ध आहे. झणझणीत पदार्थांची चव चाखायची असल्यास कोल्हापूरला आवर्जून भेट द्या आणि तेथील पदार्थांचा आस्वाद घ्या.
कोल्हापूर शहरातील तांबडा रसा जगभर प्रसिध्द आहे. हा एक मसालेदार पदार्थ आहे. तांबडा रसा बनवण्यासाठी नारळाचा वापर कमी करून लाल मिरची आणि कोल्हापुरी मसाला जास्त प्रमाणात वापरला जातो. तांबडा रस्याची चव वाढवण्यासाठी यात कांदा आणि टोमॅटोचा सार घातला जातो. अनेक पर्यटक तांबडा रस्याची चव चाखण्यासाठी कोल्हापूरला भेट देतात.
महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराची खासियत म्हणजे पांढरा रसा आहे. पांढरा रसा बनवण्यासाठी नारळाचे दूध आणि मटणाचा अर्क वापरला जातो. त्याचबरोबर या पदार्थामध्ये दालचिनी, वेलची, आलं-लसूण पेस्ट चवीनुसार टाकले जाते.
कोल्हापूरची झणझणीत मिसळ खाण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी होते. कोल्हापुरातील मिसळ पाव नाश्त्यासाठी खूप लोकप्रिय पदार्थ आहे. मिसळ बनवण्यासाठी कोल्हापुरी मसाला त्याचबरोबर मटकी, कांदे, टोमॅटे, गरम मसाला, बटाटा ,आलं-लसूण, नारळ आणि फरसाण इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. कोल्हापूर मधील मिसळ ब्रेडसोबत खाल्ली जाते.
भेळ हा संध्याकाळच्या स्नॅकचा बेस्ट ऑप्शन आहे. त्यात जर भेळ कोल्हापूरची असेल तर संध्याकाळ भन्नाट होते. कोल्हापुरी भेळ बनवण्यासाठी कुरमुरे, फरसाण, चिरलेला कांदा , टोमॅटो इत्यादी पदार्थ लागतात. या भेळची खासियत म्हणजे त्यात मसालेदार चटणी, कुरकुरीत मसाला डाळ आणि गोड चटणी घातली जाते. कोल्हापुरी भेळचा आनंद लाखो पर्यटक चहासोबत घेतात.
कोल्हापूर मधील कटवडा हा एक पारंपारिक पदार्थ आहे. कटवडा हा पदार्थ लोकांना त्याच्या चवीमुळे आणि परिपूर्ण सुगंधामुळे फार आवडतो. बटाटा हा कटवडा बनवण्यासाठी प्रमुख घटक आहे. बटाट्यात सर्व मसाले टाकून त्याचे गोळे करून ते बेसन पिठामध्ये घोळवून त्यानंतर तळले जातात. नंतर त्यावर गरमागरम तरी घातली जाते. कटवडा सर्व्ह करताना त्यावर चिरलेला कांदा , मिरची, कोथिंबीर घालून सजावट केली जाते. कटवडा हा पदार्थ स्नॅकसाठी उत्तम आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.