Besan Flour Different Recipes: बेसन पिठातले भजी खाऊन कंटाळा आलाय? मग आजच ट्राय करा 'या' रुचकर रेसिपी

Besan Flour 5 Yummy Recipes: बेसन पिठापासून तयार होणाऱ्या ५ टेस्टी रेसिपी. या रेसिपी तुम्ही स्नॅक्ससह जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. बेसन पिठाच्या अशा रेसिपी तुम्ही आजवर कधी चाखल्या नसतील.
Besan Flour 5 Yummy Recipes
Besan Flour Different RecipesSaam TV
Published On

Delicious Besan Flour Recipes in Marathi: चण्याची डाळ वाटून बेसन पीठ बनवलं जातं. बेसन पिठाचा वापर करून आपण विविध पदार्थ बनवू शकतो. मात्र अनेक व्यक्ती बेसन पिठाचा वापर फक्त भजी बनवण्यासाठीच करतात. सतत भजी खाऊन आता तुम्ही सुद्धा कंटाळले असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी बेसन पिठात तयार होणाऱ्या काही सिंपल आणि टेस्टी रेसिपीची माहिती सांगणार आहोत.

Besan Flour 5 Yummy Recipes
Vada Pav Recipe: १० मिनिटांत बनवा मुंबईचा स्ट्रीट स्टाईल वडापाव; सोपी रेसिपी वाचा

बेसनचे सूप

बेसन पीठ दळलेलं असेल तर तुम्ही घरच्याघरी यापासून सूप बनवू शकता. तेलात जिरे आणि मोहरीची फोडणी द्या आणि एक कांदा त्यात शिजवून घ्या. तसेच यामध्ये हिरवी मिरची टाका आणि बेसन पीठ मिक्स करा. अशा पद्धतीन तयार झाले तुमचे चविष्ट बेसन सूप.

बेसन पोळा

बेसन पोळा बनवताना तुम्हाला एका भांड्यात तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर, जिरे आणि थोडा कांदा घेऊन यात बेसन मिक्स करावे लागेल. हे सर्व मिक्स केल्यावर गॅसवर पसरवून याचा पोळा बनवून घ्या. अशा पद्धतीने तु्म्ही चविष्ट बेसन पोळा बनवू शकता.

बेसन लाडू

बेसन पिठाचे लाडू प्रत्येकाला आवडतात. हे लाडू बनवताना तुम्हाला जास्त साहित्याची आवश्यकता नसते. तुपामध्ये बेसन पीठ मंद आंचेवर भाजून घ्या. त्यानंतर या पिठात थोडी वेलची पावडर आणि पिठी साखर मिक्स करून तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स यात टाकून घ्या. त्यानंतर या पिठापासून लाडू वळा.

बेसन ब्रेड

नाश्त्यासाठी बेसन पिठातली ही रेसिपी फार टेस्टी लागते. त्यासाठी सर्वात आधी बेसन एका वाटीत काडून घ्या आणि त्यात मीठ, मसाला तसेच हळद आणि कोथिंबीर टाकून घ्या. त्यानंतर एक एक करून ब्रेड यामध्ये भिजवून घ्या आणि गॅसवर शॅलो फ्राय करा. अशा पद्धतीने तयार झाला बेसन ब्रेड तुम्ही याला ब्रेड पकोडा सुद्धा म्हणू शकता.

बेसन शिरा

बेसन शिरा बनवणे सुद्धा फार सोप्प आहे. यासाठी बेसन पीठ जास्तीत जास्त तुपात भाजून घ्या. म्हणजे एक वाटी पिठासाठी एक वाटी बेसन घ्या. त्यानंतर यामध्ये साखर आणि आवडीचे ड्राय फ्रूट्स मिक्स करत दुधामध्ये पीठ शिजवून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही बेसन पिठापासून शिरा बनवू शकता.

Besan Flour 5 Yummy Recipes
Ghevar Recipe : लाडक्या गणरायाला बनवा 'घेवर'चा चविष्ट नैवेद्य; वाचा सिंपल रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com