Chapati Pizza Recipe: पोळीपासून घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि हेल्दी पिझ्झा; पाहा रेसिपी

Chapati Pizza Recipe : पिझ्झा हा सर्वांनाच आवडतो. पिझ्झा हा पदार्थ शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे अनेकजण पिझ्झा खाणे टाळता. परंतु तुम्ही घरच्या घरी चपातीचा पौष्टिक पिझ्झा बनवू शकतात.
Chapati Pizza Recipe
Chapati Pizza RecipeSaam Tv
Published On

Chapati Pizza Recipe News In Marathi:

पिझ्झा हा पदार्थ सर्वांना खूप आवडतो. पिझ्झा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण खतात. परंतु पिझ्झामध्ये मैदा असल्याने अनेकजण आरोग्याच्या दृष्टीने पिझ्झा खाणे टाळतात. परंतु तुम्ही घरच्या घरी पौष्टिक पिझ्झा बनवू शकतात.

पिझ्झामध्ये मैद्याचा बेस असतो. मैदा हा शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे पिझ्झा खाणे टाळावे लागते. त्यामुळेच तुम्ही घरी पोळीचा पौष्टिक पिझ्झा बनवू शकतात. पोळीचा पिझ्झा हा खायला खूप चविष्ट असतो. त्याचसोबत शरीरासाठीही चांगला असतो. हा पिझ्झा लहान मुले सहज खाऊ शकतात.

अनेकांच्या घरी रात्रीचे जेवण पूर्ण संपत नाही. एखादी पोळी शिल्लक राहते. ही पोळी फेकून देण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी या पोळीचा पिझ्झा तु्म्ही बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला पोळीच्या पिझ्झाची रेसिपी सांगणार आहोत. (Latest News)

साम्रगी

  • रात्रीच्या उरलेल्या चपात्या

  • ऑलिव्ह ऑइल किंवा बटर

  • कांदा

  • शिमला मिरची

  • पनीर

  • टॉमेटो

  • काळी मिरी

  • पिझ्झा सॉस

  • चिली फ्लेक्ल

  • मोझेरेला चीज

  • पिझ्झा सॉस किंवा केचअप

Chapati Pizza Recipe
Heat Stroke: उन्हाळ्याची चाहुल लागतेय, उष्माघाताचा त्रास जाणवल्यास अशी 'घ्या' काळजी

कृती

सर्वप्रथम कांदा, टॉमेटो, शिमला मिरची धुवून कापून घ्या. या सर्व भाज्या एका भांड्यात एकत्र करा. त्यात चौकोनी काप केलेले पनीर, काळी मीरी, पिझ्झा सॉस, ऑलिव्ह ऑइल टाकून मिक्स करा. ऑलिव्ह ऑइलऐवजी तुम्ही बटर किंवा लोणीदेखील वापरु शकता. त्यानंतर एका चपातीला टॉमेटो केचअप किंवा पिझ्झा सॉस लावा. यावर मोझेरेला चीज टाका. गॅसवर तवा गरम करा. त्यावर बटर टाकून चपाती गरम करा. त्यावर झाकण ठेवा. चीज वितळल्यानंतर पिझ्झा ताटात ठेवा. यावर चिली फ्लेक्स टाकून तुम्ही पिझ्झा खाऊ शकता.

Chapati Pizza Recipe
Bajarichi Khichdi Recipe : थंडीत झटपट तयार करा पौष्टिक चमचमीत बाजरीची खिचडी, २० मिनिटांत बनेल; पाहा रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com