Pizza Diet: पठ्ठ्यानं चक्क महिनाभर पिझ्झा खाऊन केलं वजन कमी, भन्नाट डाएट प्लान पाहा

Pizza Diet Plan: सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोक फास्ट फूड जास्त प्रमाणात खातात. फास्ट फूड खाऊन शरीरावर वाईट परिणाम होतो. परंतु एका फिटनेस ट्र्नरने चक्क महिनाभर फक्त पिझ्झा खाऊन डाएट केले आहे.
Pizza Diet Plan
Pizza Diet PlanSaam Tv
Published On

Fitness Trainer 30 Days Pizza Diet To Reduce Weight:

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर खूप परिणाम होतो. धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा फास्ट फूड खाते त्यामुळे आजारपण येतात. त्यासाठी अनेकजण जिमला जातात, व्यायाम करतात. फास्ट फूड खायचे नाही, असे ठरवतात. आजपर्यंत फास्ट फूड खालल्याने शरीराला धोका निर्माण होते असे ऐकले असेल. पण एका जीम ट्रेनरने चक्क पिझ्झा खाऊन वजन कमी केलं आहे. त्याचे हे डाएट सध्या चर्चेचा विषय आहे.

पिझ्झा खालल्याने वजन वाढते. सतत पिझ्झा खालल्याने शरीराला त्रास होतो. मात्र, एका फिटनेस ट्रेनरने पिझ्झा खाऊन वजन कमी केले आहे. याचा व्हिडिओदेखील त्याने शेअर केला आहे. (Latest News)

रायन मर्सर या फिटनेस ट्रेनरने हा डाएट केला आहे. रायन हा ३४ वर्षांचा आहे. त्याने एक महिना म्हणजेच ३० दिवस दिवसातून तीन वेळा फक्त पिझ्झा खाल्ला आणि वजन कमी केले आहे. रायनने महिनाभर दरदिवशी पिझ्झाचे १० स्लाईस खाल्ले आणि चक्क ३.४ किलो वजन कमी केले आहे.

रायनने डाएट केला आहे. त्यात ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी पिझ्झा खाल्ला आहे. प्रत्येकाच्या शरीराची कॅपॅसिटी ही वेगळी असते. त्यानुसार डाएट करावे असे रायनने सांगितले आहे. थंडीच्या दिवसात वजन कमी करणे सोपे असते. त्यामुळे मी जानेवारी महिन्यात वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पिझ्झा खाऊन डाएट करायचे ठरवले. यासाठी मी घरीच पिझ्झा तयार करायचो. कॅलरी संतुलित आहे याचा विचार करुनच मी पिझ्झा खाललो. मी मोजून मापून पिझ्झा खायचो. त्यामुळे माझ्या कॅलरीज वाढत नव्हत्या. मी रोज ७ फळे आणि पालेभाज्यादेखील खायचो, असे रायनने सांगितले.

Pizza Diet Plan
Parenting Tips : पालकांनो, १५ दिवसांपासूनच सुरु करा या गोष्टी, मुलांना पेपर जातील एकदम सोपे

प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी आवश्यक आणि पचनक्रियेवर ताण येणार नाही, असा डाएट करावा. पिझ्झा खाऊनदेखील तुम्ही कॅलरीज मेनटेन करु शकता असे रायनने या व्हिडिओतून सांगितले आहे.

Pizza Diet Plan
Anemia Affect Fertility : अशक्तपणामुळे आई होण्यास अडचण? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com