Parenting Tips : पालकांनो, १५ दिवसांपासूनच सुरु करा या गोष्टी, मुलांना पेपर जातील एकदम सोपे

Exam Stress : प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने परीक्षेत टॉप करावे, अभ्यासात हुशार व्हावे असे वाटते. मुले त्यांच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करतात. परंतु, अनेकदा याचा त्यांना ताण येतो.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv
Published On

Parents Change these Habits :

लवकरच मुलांच्या बोर्डाच्या आणि वार्षिक परीक्षा सुरु होतील. या काळात मुलांना अभ्यासाचा अधिक ताण येतो. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

प्रत्येक पालकाला (parents) आपल्या मुलाने परीक्षेत टॉप करावे, अभ्यासात हुशार व्हावे असे वाटते. मुले त्यांच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करतात. परंतु, अनेकदा याचा त्यांना ताण येतो. परीक्षेपूर्वी पालकांनाही तणावाचा सामना करावा लागतो. याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो. जर तुमच्या मुलांच्याही परीक्षा (Exam) जवळ येत असतील तर पालकांनी या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

1. घरातील वातावरण

मुले जेव्हा परीक्षेचा ताण (Stress) अधिक घेतात तेव्हा घरातील वातावरण बिघडते. बरेचदा पालकांची आपापसातील भांडणांचा परिणामही मुलांवर होतो. ज्यामुळे त्यांचे मन अभ्यासात त्यांचे मन लागत नाही. त्यामुळे घरातील वातावरण आनंददायी ठेवा.

Parenting Tips
Parenting Tips : तुमचीही मुलं वर्गात टॉप करतील? बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी या ५ गोष्टी करा

2. नकारात्मकता

बरेचदा पालकांचा मुलांवर विश्वास नसतो. त्यांना असे वाटते की, आपल्या मुलांला कमी मार्क्स मिळतील. पालकांच्या या नकारात्मक वृत्तीमुळे मुलांचा आत्मविश्वास दुखावतो. त्यामुळे तुमची ही सवय बदलायला हवी.

3. दिनचर्या महत्त्वाची

परीक्षेच्या काही दिवसांआधी पालकांनी मुलांच्या वेळेचे व्यवस्थापन करावे. सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची वेळ ठरवा. त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक ठरवा.

Parenting Tips
Kolhapur Travel Places : ऐतिहासिकतेचा वारसा असलेलं कोल्हापूर, फॅमिलीसोबत या ठिकाणांना भेट द्या

4. भावनिक आधार

परीक्षेच्या वेळी मुलांना भावनिक आधार हा खूप महत्त्वाचा असतो. मुले अभ्यास करताना त्यांना अधिक अडचणी येतात. मानसिक त्रास होतो अशावेळी पालकांनी मुलांना भावनिक आधार देऊन त्यांचे अभ्यासात मन कसे रमेल याची काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com