दरवर्षी उन्हाळा (Summer Tips) सुरु झाला की, उष्माघातामुळे झालेले मृत्यू ही बातमी आवर्जून वाचायला मिळते. आता हळुहळू उन्हाळ्याची चाहुल लागायला सुरूवात झाली आहे. त्याअगोदर आपण नेमकं उष्माघात (Heat Stroke) म्हणजे काय, तो कसा होतो आणि आपण त्याच्यावर काय उपाय करू शकतो? हे सविस्तर जाणून घेऊ या. (marathi news)
संपूर्ण महाराष्ट्रात मार्च एप्रिलमध्ये उन्हाचा कहर जाणवतो. लोकंच नाही तर पशू-पक्षीही उन्हामुळे हैरान होतात. आता पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहील. त्यामुळे आपण उष्माघातापासून कसा बचाव करायचा, हे जाणून घेऊ या.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उष्माघाताची लक्षणे काय आहेत
उष्माघाताची लक्षणे (Heat Stroke Symptoms) काय आहेत ते आपण जाणू घेऊ या. डोकं दुखणे, चक्कर येणे, सुस्ती आल्यासारखं वाटणे आणि डोकं हलकं झाल्यासारखं वाटणे, त्वचा लालसर होणे, त्वचा कोरडी पडणे, गरम होत असूनही घाम न येणे, मळमळ होणे, उलट्या होणे, अशक्तपणा जाणवणे, हृदयाचे ठोके वाढणे, जोरात श्वास घेणे ही सगळी उष्माघाताची लक्षणं आहे. जर तुम्हाला कुणामध्ये ही लक्षणं दिसून आली. तर त्याला उष्माघाताचा त्रास होतो, हे समजावं. त्याला तातडीने उपचार उपलब्ध करुन द्यावेत.
अशा व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल (Health Tips Heat Stroke) करा. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्या व्यक्तीला थंड जागेत ठेवा. रुग्णाला पाणी द्या. तो शुद्धीत असेल तर त्याला ग्लूकोजयुक्त ड्रिंक्स द्या. थंड पाणी, स्प्रे किंवा आईस पॅकने त्या व्यक्तीचं शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे उष्माघात झालेल्या व्यक्तीची आपण काळजी घेऊ शकतो.
उष्माघातापासून बचाव होण्यासाठी काय करायचं
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी ((Health Tips) प्या. दररोज 8 ग्लास पाणी प्यायला हवं. अंघोळ करताना थंड पाण्याचा वापर करा. आहार हलका घ्या. आहारात काकडी, कलिंगड, ताक यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करा. जास्तीत जास्त सुती कपड्यांचा वापर करा. उन्हात बाहेर पडणं टाळा. उन्हात असाल तर टोपी, छत्री, स्कार्फ यांचा वापर करा.
अतिरिक्त मद्यमान, साखर असलेले पेय किंवा कॅफेन असलेले पेय टाळा. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अतिप्रमाणात व्यायाम करणं टाळा. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करणे अत्यंत गरजेचं (Heat Stroke Treatment Precautions) आहे. त्यामुळे उन्हात बाहेर जाणं टाळा, गरज असेल तेव्हाच बाहेर पडा. बाहेर जाताना डोकं आणि शरीर कपड्याने झाका. सावधानता बाळगा आणि उन्हाळ्यात सुरक्षित राहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.