Mumbai Heat Islands : मुंबईचा 'ताप' वाढतोय; जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी, काय आहेत कारणं?

Mumbai News Update : रिपोर्टनुसार, मुंबई शहरात वेगाने होत असलेल्या विकासकामांमुळे तापमानात वेगाने वाढत आहे.
Heat Wave
Heat WaveSaam Tv

Mumbai News : मुंबई बेटावर वसलेलं शहर आहे, पण जसजशी वर्षे लोटली, तसं हे शहर अक्राळविक्राळ वाढत गेलं. काँक्रिटचे रस्ते, टोलेजंग इमारती आणि लोकसंख्याही वाढली. हेच बेटावरचं शहर आता 'ज्वालामुखी' होऊ लागलं आहे. जगातील सर्वात उष्ण सहा प्रमुख शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक उष्णता जाणवू लागलीये. उरात धडकी भरवणारा यासंबंधीचा अहवाल समोर आला आहे.

मुंबई शहराचं केंद्र जगातील बेटावर वसलेल्या सहा प्रमुख शहरांपैकी दुसरे सर्वाधिक 'हॉट स्पॉट' बनले आहे. शहरातील नागरिक उपनगरातील भागांपेक्षा 7 अंश सेल्सिअस जास्त तापमान अनुभवत आहेत, एका रिपोर्टमधून ही माहिती उघड झाली आहे. रिपोर्टनुसार, मुंबई शहरात वेगाने होत असलेल्या विकासकामांमुळे तापमानात वेगाने वाढत आहे.

Heat Wave
Moon Photos From Chandrayaan-3 : चांद्रयान-3 ने पाठवले चंद्राचे अगदी जवळचे फोटो, ISROने शेअर केले दोन VIDEO

याची तीव्रता जाणून घेण्यासाठी अर्बन हीट आयलंड (UHI) म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. यामध्ये शहरी भागातील तापमान आणि नजीकच्या उपनगरांमधील सरासरी तापमानात विशिष्ट वेळेत लक्षणीय फरक असतो. मुंबई शहरातील लोक मुंबई बाहेरील परिसरापेक्षा 7 अंश सेल्सिअस जास्त तापमान अनुभवत आहेत. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.  (Latest Marathi News)

हिरव्यागार शहरांची जागा आता काँक्रिटच्या जंगलांनी घेतली आहे. उंच इमारती, फुटपाथ, डांबरीकरण, इमारतींवरील काचा इत्यांदींमुळे या भागात अधिक उष्णता शोषून घेतली जाते आणि त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे रहिवाशांमध्ये उष्मा संबंधित आजार देखील वाढत आहेत. (Maharashtra News)

Heat Wave
Railway Accident CCTV Footage : बायकोला धक्का लागला, पतीने कानशिलात लगावली; लोकलखाली सापडून तरुणाचा मृत्यू VIDEO

परंतु नकळतपणे शहरे उष्ण होण्यासाठी आपण डिझाईन करत आहोत. ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट कन्सल्टन्सी अरुप डेव्हलपमेंटने उष्णतेचा प्रभाव आजूबाजूच्या परिसरात कसा होतो हे समजून घेण्यासाठी अर्बन हीट स्नॅपशॉट (UHS) प्रसिद्ध केला आहे. या अहवालात शहराची रचना शहरी तापमान कशी वाढवत आहे यावर प्रकाश टाकला आहे.

अर्बन हीट आयलंड्समध्ये बेटावर वसलेल्या जगातील मद्रिद, मुंबई, कॅरो, लॉस एंजेलिस, लंडन, आणि न्यूयॉर्क या शहरांना अनुक्रमे समावेश आहे. 2022 मधील प्रत्येक शहरातील सर्वात उष्ण दिवशी तापमानातील फरक समजून घेण्यासाठी UHS ने सहा विविध शहरांमधील शहरी केंद्रांच्या 150 चौरस किमी परिसरात सर्वात जास्त हॉट स्पॉट असलेल्या भागांचा अभ्यास केला.

2022 च्या उन्हाळ्यात भारताने उष्णतेची लाट अनुभवली. ज्यात देशातील काही भागांमध्ये तापमान 49 अंस सेल्सिअस पेक्षा जास्त झाले होते. संशोधकांनी या उष्णतेच्या लाटेत 16 मार्चमधील मुंबईतील डेटा पाहिला. त्यात असे आढळले की सर्वात उष्ण UHI उत्तर मुंबईमधील घाटकोपर पूर्व येथे आहे. येथील तापमान ग्रामीण परिसरापेक्षा 7 अंश सेल्सिअस जास्त होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com