Bajarichi Khichdi Recipe : थंडीत झटपट तयार करा पौष्टिक चमचमीत बाजरीची खिचडी, २० मिनिटांत बनेल; पाहा रेसिपी

Winter Special Recipe : बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी असे पदार्थ हिवाळ्यात अनेक घरांमध्ये खाल्ले जातात. यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण मिळते. शरीरात उष्णता टिकून राहाते.
Bajarichi Khichdi Recipe
Bajarichi Khichdi Recipe Saam Tv
Published On

How To Make Bajarichi Khichdi :

महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडी वाढू लागली आहे. या काळात शरीराला उब देणारे पदार्थ खाल्ले जातात. शरीराला गरम ठेवण्यासाठी आपण अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा लागतो जे गरम असतात. या ऋतूमध्ये बाजरीचा आहारात हमखास समावेश केला जातो.

बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी असे पदार्थ हिवाळ्यात अनेक घरांमध्ये खाल्ले जातात. यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण मिळते. शरीरात उष्णता टिकून राहाते. खिचडी हे लो कॅलरी फूड आहे. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी खिचडी आपण खाऊ शकतो. तसेच आजारी असताना बाजरीची खिचडी अतिशय फायदेशीर ठरते पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य | Ingredients

  • बाजरी १ वाटी I Bajari 1 cup

  • पिवळी मूग डाळ १/२ वाटी I Yellow Moong Daal 1/2 cup

  • मीठ १ चमचा I Salt 1 tsp

  • हळद १/२ चमचा I turmeric 1/2 tsp

  • पाणी ३ वाटी I Water 3 cups

  • तूप/तेल ३ चमचा I Oil/Ghee 3 tsp

  • मोहरी १/२ चमचा I Mustard Seeds 1/2 tsp

  • जिरे१/२ चमचा I Cumin Seeds ½ tsp

  • हिंग १/४ चमचा I Asafoetida 1/4 tsp

  • उभी चिरलेली हिरवी मिरची २-३ I Sliced finely chopped green Chillies 2-3

  • हळद १/२ चमचा I Turmeric ½ tsp

  • मिरची पूड १ चमचा I Red Chilli Powder 1 tsp

  • गरम मसाला १ चमचा I Garam Masala 1 tbsp

  • आले लासू पेस्ट १ चमचा I Ginger Garlic Paste 1 tbsp

  • मीठ १/२ चमचा I Salt 1/2 tsp

  • गरम पाणी गरजे प्रमाणे I Hot Water As per requirement

  • बारीक चिरलेली कोथिंबीर गरजेप्रमाणे I Finely Chopped Coriander As per requirement

  • तूप २-३ चमचे I Ghee 2-3 tsp

  • हिंग १/४ चमचा I Asafoetida ¼ tsp

  • लाल सुखी मिरची २-३ I Red Dry Chilli 2-3

  • बारीक चिरलेला टोमॅटो २ मध्यम I Finely chopped Tomatoes 2 medium

  • उभा बारीक चिरलेला कांदा २ मध्यम I Sliced finely chopped onions 2 medium

  • गाजर १/२ वाटी I Carrots ½ cup

  • मटार १/२ वाटी I Green Peas ½ cup

  • बटाटा १/२ वाटी I Potatoes ½ cup

  • लिंबू १ चमचा I Lemon 1 tsp

Bajarichi Khichdi Recipe
Dum Anda Biryani Recipes : ढाबा स्टाईलने बनवा दम अंडा बिर्याणी, या सोप्या टिप्स लक्षात ठेवा; एकदा चव चाखाल तर खातच राहाल

2. कृती

  • सर्वात आधी बाजरी आणि डाळ भिजवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये भिजवलेली बाजरी आणि डाळ घाला.

  • त्यात मीठ, हळद आणि ३ कप पाणी घालून ४ ते ५ शिट्ट्या होऊ द्या.

  • कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, हिंग, कांदा, हिरवी मिरची टाकून चांगले भाजून घ्या.

  • टोमॅटो घालून परतवून घ्या. सर्व भाज्या घालून मिक्स करून शिजवा.

  • हळद, मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून मिक्स करा.भाजी शिजली की त्यात शिजलेली बाजरी आणि गरम पाणी घाला. मंद आचेवर ५-६ मिनिटे शिजू द्या.

  • तुपात सुक्या लाल मिरच्या आणि हिंगाचा तडका द्या. वरुन कोथिंबीर आणि लिंबाच्या रस घाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com