Trigrahi Yog 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

Trigrahi Yog 2024 : त्रिग्रही योग! या लोकांच्या इच्छा होणार पूर्ण, आरोग्याची काळजी घ्या; कसे असेल १२ राशींचे राशीफल

Budh Gochar In Kumbh Rashi 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. अशातच बुध ग्रहाने २० फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्यावेळी २ किंवा अधिक ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा शुभ किंवा अशुभ योग तयार होतात.

कोमल दामुद्रे

Budh Gochar 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. अशातच बुध ग्रहाने २० फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्यावेळी २ किंवा अधिक ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा शुभ किंवा अशुभ योग तयार होतात.

कुंभ राशीत शनि, सूर्य आणि बुध एकाच वेळी आल्याने त्रिग्रही योग तयार झाला आहे. हा योग काही राशींसाठी लाभदायक ठरेल. तर काहींना पैशांची (Money) चणचण भासेल. जाणून घेऊया १२ राशींचे राशीफल.

1. मेष

मेष राशीच्या लोकांसाठी ही युती करिअर क्षेत्रात प्रगती आणि आत्मसन्मान मिळवून देईल. नोकरीत बढती मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहिल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ मिळेल. आरोग्याची (Health) काळजी घ्याल.

2. वृषभ

उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअर, कौटुंबिक आणि आर्थिक दृष्टीने हा काळ खूप चांगला असेल. करिअरमध्ये मोठे स्थान मिळवाल. परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. व्यवसायातून (Business) आर्थिक लाभ होतील.

3. मिथुन

बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. लांबचा प्रवास होईल.त्यात यश मिळेल. कुटुंबात सुख-सुविधा वाढतील. करिअरमध्येही नशिबाची साथ मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध चांगले होतील.

4. कर्क

अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळवण्याची शक्यता आहे. जागा बदलण्याची शक्यता. नोकरीत बढती मिळेल. आरोग्य ठीक राहिल.

5. सिंह

नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक प्रगती होईल. शेअर बाजारात गुंतवणूक करुन तुम्हाला नफा मिळेल. प्रेम जीवन आनंदी राहिल. आरोग्य उत्तम राहिल.

6. कन्या

आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत बदल संभावतो. करिअरमध्ये काही गोष्टींचा सामना करावा लागेल. आर्थिक अडचणींमुळे कर्ज घ्याल. आरोग्य सरासरी राहिल.

7. तूळ

अध्यात्माकी गोष्टींकडे कल अधिक राहिल. तीर्थयात्रा कराल. करिअरमध्ये प्रमोशन मिळू शकते. शेअर बाजारातून आर्थिक लाभ होतील. आर्थिक स्थैर्य राहिल. नात्यात गोडवा येईल. आरोग्य उत्तम राहिल.

8. वृश्चिक

कुटुंबात सुख-सुविधा मिळतील. करिअरमध्ये खूप काम होईल. जोडीदारासोबतच्या नात्यात दुरावा येईल. आरोग्याची काळजी घ्या. पैसे अधिक खर्च होतील.

9. धनु

व्यवसाय करण्यासाठी परदेशात जावे लागेल. प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये नफा होईल. व्यवसायात प्रगती होईल. आरोग्य चांगले राहिल.

10. मकर

करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी फारसा चांगला नाही. चढउतारांना सामोरे जावे लागेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. नोकरीतील बदलामुळे तुम्हाला समाधान वाटेल. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा.

11. कुंभ

वडिलोपार्जित संपत्तीतून पैसा कमावण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे संक्रमण लाभदायक असेल. मुलांच्या तब्येतीची काळजी वाटेल. जोडीदारासोबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. संयम राखणे अधिक गरजेचे आहे.

12. मीन

तणावामुळे आनंदात विरजन पडेल. करिअरच्या क्षेत्रात खूप काम करावे लागेल. अतिरिक्त खर्च होईल. आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. व्यवसायात नुकसान होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस बरसणार ; जाणून घ्या सविस्तर

GK: दोन राष्ट्रपती असलेला एकमेव देश कोणता? ९९% लोकांना माहित नसेल

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT