Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : ग्रहांची युती! ५ राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा, पैशांची चणचण भासेल

कोमल दामुद्रे

मेष

वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता. वाहन चालवताना काळजी घ्याल. व्यवसायात भरभराटी होईल.

वृषभ

उत्पन्नात वाढ होईल. नवीन काम मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल.

मिथुन

काम करण्यात सक्षम व्हाल. प्रशंसा होईल. दबदबा वाढेल. स्वत:च्या कमकुवतपणावर मात कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

कर्क

व्यवसायात चढ-उताराचा सामना करावा लागेल. नोकरी बदलण्याची संधी येईल. आरोग्याची काळजी घ्याल.

सिंह

नोकरीच्या ठिकाणी अडचणी येतील. पैशांची चणचण भासेल. वाहन चालवताना काळजी घ्याल दु:खापत होण्याची शक्यता आहे.

कन्या

जोडीदाराशी वाद थांबतील. वैवाहिक जीवनात तुम्हाला सहकार्य मिळेल. अतिरिक्त खर्च होईल.

तुळ

जवळच्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता. कामाला गती येईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. अडकलेले पैसे मिळतील.

वृश्चिक

अतिरिक्त खर्च होईल. कुटुंबाची साथ मिळेल. वैवाहिक सुख मिळेल. व्यवसायात वाढ होईल.

धनु

व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या नव्या संधी मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा. वाद होऊ शकतो.

मकर

उत्पन्नात घट होईल. कामात अडथळे येतील. प्रेमात अपयश मिळेल.

कुंभ

आरोग्याची काळजी घ्याल. जोडीदाराशी वादविवाद होतील. परीक्षेची तयारी कराल.

मीन

शिक्षणात यश मिळेल. वैवाहिक सुखात दु:खाचा सामना करावा लागेल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : वीकेंडला पार्टनरसोबत फिरा भन्नाट पर्यटनस्थळांना, बजेटमध्ये एन्जॉय करा अलिबागची ट्रिप

Alibaug Travel Place | Saam Tv