Guava Mojito Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Guava Mojito Recipe : गर्मीने प्रचंड हैराण? घरच्या घरी ट्राय करा खास क्लासिक थंडगार 'Guava Mojito Mocktail', पाहा रेसिपी

Guava Mojito : घरच्या पार्टीत स्पेशल क्लासिक फ्रूट कॉकटेल सर्व्ह करायचे असेल तर तुम्ही कमी वेळात झटपट कॉकटेल रेसिपी बनवू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Recipe Of Guava Mojito : घरच्या पार्टीत स्पेशल क्लासिक फ्रूट कॉकटेल सर्व्ह करायचे असेल तर तुम्ही कमी वेळात झटपट कॉकटेल रेसिपी बनवू शकता. हा मोजिटो बनवण्यासाठी पेरूचा ज्यूस, पांढरा रम आणि लिंबाचा रस एकत्र करून पेरू मोजिटो तयार केला जातो.

त्यात थोडी साखर घाला. त्यावर तुम्ही पुदिन्याच्या पानांनी सजवू शकता. तुम्ही त्यात काही मसालेही घालू शकता. ही कॉकटेल रेसिपी (Recipe) कोणत्याही पार्टी किंवा विशेष प्रसंगी स्टार्टर ड्रिंक (Drinks) म्हणून दिली जाते.

साहित्य -

पेरू - 3 कप (चौकोनी तुकडे)

चूर्ण साखर - 1/2 कप

लिंबाचा रस - 1 टीस्पून

मीठ - 3/4 टीस्पून

काळे मीठ - 1/2 टीस्पून

सोडा पाणी - 6 कप

रेसिपी -

  • Guava Mojito Mocktail बनवण्यासाठी प्रथम पेरू आणि 3/4 कप पाणी (Water) मिक्सरच्या भांड्यात मिसळा आणि बारीक वाटून घ्या.

  • मिश्रण एका खोलगट भांड्यात काढा.

  • नंतर त्यात साखर, लिंबाचा रस, मीठ आणि काळे मीठ टाकून चांगले मिक्स करून बाजूला ठेवा.

  • यानंतर, सर्व्हिंग ग्लासमध्ये 2 चमचे तयार पेरूचे मिश्रण ठेवा आणि त्यावर 1/2 कप सोडा पाणी घाला, चांगले मिसळा आणि लगेच सर्व्ह करा.

  • पेरूचे मिश्रण एअर टाइट कंटेनरमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये एका आठवड्यापर्यंत साठवून ठेवू शकता तुमचा Guava Mojito आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

  • पुदिन्याच्या (Mint Leaves) पानांनी सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT