Crispy Hash Brown Recipe : बटाट्यापासून बनवा क्रिस्पी 'हॅश ब्राउन', पाहा रेसिपी

Crispy Hash Brown : बटाटा म्हटलं की असंही तोंडाला पाणी सुटतं.
Crispy Hash Brown Recipe
Crispy Hash Brown RecipeSaam Tv
Published On

Recipe Of Crispy Hash Brown : बटाटा म्हटलं की असंही तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती भाजी म्हणजे बटाटा. बटाट्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्याकडे करण्यात येतात. अगदी फ्राईज, भाजी, रस्सा, स्नॅक्स असे विविध चविष्ट पदार्थ आपण बटाट्यापासून तयार करतो.

बटाट्याची रेसिपी क्वचितच कुणाला आवडत नाही. तर यावेळी आपण त्यातून एक अप्रतिम रेसिपी तयार करू. एक तुकडा खाल्ल्यानंतर तृप्त होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया त्याची रेसिपी.

Crispy Hash Brown Recipe
Mango Halwa Recipe : आंब्याच्या सिझनमध्ये बनवा चविष्ट असा मँगो हलवा, पाहा रेसिपी

साहित्य -

  • 5 बटाटे

  • 3 चमचे तांदळाचे पीठ, 3 चमचे मैदा

  • 1/4 चमचा काळी मिरी पावडर

  • 1/2 चमचा चिली फ्लेक्स

  • लाल तिखट

  • चवीनुसार मीठ

  • चीज

Crispy Hash Brown Recipe
Rava Appe Recipe : घरच्या घरी झटपट बनवा खमंग अन् खुसखुशीत रवा आप्पे, पाहा रेसिपी

कृती -

  • सर्वप्रथम बटाटे सोलून स्वच्छ (Clean) धुवा आणि नंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बटाटे किसून बटाटे दोन ते तीन वेळा नीट धुवून घ्या.

  • एका भांड्यात पाणी (Water) उकळण्यासाठी ठेवा, पाणी उकळून आल्यावर त्यात किसलेले बटाटे घालून एक ते दीड मिनिटे उकळवा.

  • त्यानंतर एका वाटीत बर्फाचे तुकडे टाका. भांड्यावर कापड (Cloths) ठेवा आणि या कपड्यावर उकडलेले बटाटे काढा.

  • बटाटा बर्फाच्या पाण्यात एक ते दोन वेळा बुडवून कापडाच्या काठावर धरून ठेवा. नंतर बटाटा हाताने चांगला पिळून घ्या आणि बटाट्यातील सर्व पाणी काढून टाका.

  • आता बटाटे एका भांड्यात काढून घ्या. त्यात तांदळाचे पीठ, मैदा, लाल मिरचीचे फ्लेक्स, काळी मिरी पावडर, लाल तिखट आणि मीठ घाला आणि हाताने चांगले मिसळा.

Crispy Hash Brown Recipe
Green Garlic Chilla Recipe : ब्लड शुगर, मधुमेह, कोलेस्ट्रॉलवर फायदेशीर ठरेल ग्रीन गार्लिक चिला, पाहा रेसिपी
  • बटाट्यामध्ये चीज घालून आणि बटाटे चांगले मिक्स करा.

  • आता हाताला थोडे तेल (Oil) लावून थोडेसे मिश्रण घेऊन अंडाकृती आकारात बनवा. सर्व हॅश ब्राऊन्स त्याच पद्धतीने तयार करा.

  • कढईत तेल टाकून ते गरम करा. या तेलात हॅश ब्राऊन टाका आणि दोन्ही बाजूंनी तपकिरी होईपर्यंत तळा.

  • तयार हॅश ब्राऊन गरमगरम सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com