Travel Insurance Saam Tv
लाईफस्टाईल

Travel Insurance : फिरण्याची आवड आहे? ट्रॅव्हल इन्शुरन्सही काढाच, मिळतील अनेक फायदे

How To Get Travel Insurance : प्रवासाची आवड असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

Shraddha Thik

Why Travel Insurance Is Important :

प्रत्येकाला नवीन ठिकाणांना भेट द्यायला आवडते. त्या ठिकाणाची माहिती घेणे, नवीन खाद्यपदार्थ्यांचा आस्वाद घेणे इ. तुम्हालाही आवडते. तसेच प्रवासाची आवड असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी, तुम्ही प्रवास विमा काढणे महत्त्वाचे आहे.

कोणत्याही सहलीला सुरुवात करण्यापूर्वी, आपण आपल्या बॅगेत अनेक आवश्यक गोष्टी घेतो. परंतु आपण बहुतेकदा सर्वात महत्वाची गोष्ट विसरतो. ज्यामध्ये प्रवास (Travel) विमा समाविष्ट आहे. तुमच्या सहलीतील प्रत्येक वस्तूप्रमाणे, प्रवास विम्याचे स्वतःचे महत्त्व आहे.

प्रवासादरम्यान तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या (Problem), हरवलेले सामान किंवा कोणतीही अचानक घडलेली घटना घडल्यास प्रवास विमा विशेषतः उपयुक्त ठरेल. प्रवास विमा घेऊन तुम्ही आर्थिक नुकसान टाळू शकता. तुमच्याकडे वैद्यकीय विमा असल्यास, तुम्हाला प्रवासादरम्यान झालेल्या वैद्यकीय खर्चाची संपूर्ण रक्कम परत मिळेल. ट्रॅव्हल इन्शुरन्सचे फायदे जाणून घेऊया.

मेडिकल इमर्जन्सी

ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीच्या काळात होणाऱ्या खर्चापासून संरक्षण देतो. हॉस्पिटलची बिले, रुग्णवाहिकेचे शुल्क आदी खर्चांचा यात समावेश आहे.

हरवलेले सामान

समजा तुम्ही फ्लाइटमधून नुकतेच उतरला आहात आणि चुकून तुमचे सामान हरवले आहे किंवा तुमचे सामान उशिराने पोहोचले. अशा स्थितीत नवीन ठिकाणी नवीन कपडे (Cloths) आणि दैनंदिन गरजांसाठी पैसे खर्च करावे लागतील. जे तुम्हाला तुमच्या सामानाला उशीर झाल्यामुळे आवश्यक असेल. अशा स्थितीत, हे सर्व खर्च तुमच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांद्वारे ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये कव्हर केले जातील.

अपघातामुळे मृत्यू

प्रवास करताना अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, प्रवास विमा तुमचे संरक्षण करतो. प्रवास करताना तुम्हाला दुखापत झाली तरीही, तुमच्या विम्यांतर्गत संपुर्ण खर्च करता येतो.

व्हिसा शुल्काचा परतावा

आजकाल बर्‍याच विमा कंपन्या व्हिसा अर्ज नाकारल्यास व्हिसाच्या पैशाच्या परताव्याच्या पर्यायी अ‍ॅड-ऑन लाभाची ऑफर देतात, तुम्ही याचाही लाभ घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT