Musical Pillars Temple  Saam TV
लाईफस्टाईल

Musical Pillars Temple : भारतातलं अद्भुत मंदिर, दगडांमधून निघतात संगिताचे स्वर...; वाचा 'या' ठिकाणी कसं जायचं

Ruchika Jadhav

जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पाहून आपल्याला आश्चर्य वाटतं, तसेच आपण त्याकडे आकर्षित होतो. विविध मंदिरातींल कलाकृती त्यांचा इतिहास प्रत्येक भारतीय नागरिकाला विलक्षणीय आणि चकीत करणारा वाटतो. अशात आता भारतातलं एक अनोखं मंदिर आम्ही तुमच्यासाठी शोधलं आहे. या मंदिरातील आश्चर्यकारक बाब म्हणजे मंदिरातील दगडांतून स्वर ऐकू येतात.

कर्नाटकच्या हम्पी येथील तंगभद्रा नदी किनारी काही हजार एकरमध्ये विठ्ठलाचं मंदिरं आणि काही स्मारकं आहेत. येथील मंदिर परिसरात काही सुंदर दगड आहेत. त्या दगडांच्या पिलर्समधून थेट संगिताचे मधूर ध्वनी आणि स्वर बाहेर पडतात.

म्युजीकल पिलर्स जगभरात प्रसिद्ध

हम्पी येथील विठ्ठल मंदिरात हे दगडांचे पिलर्स आहेत. या पिलर्समध्ये लोकल ग्रेनाइटचा वापर देखील करण्यात आला आहे. एकूण ५६ पिलर्स या मंदिरात आहेत. त्यातून विविध प्रकारचं संगित येकू येतं. यातील काही दगडांच्या सुंदर आणि सुबक मूर्त्या सुद्धा बनवण्यात आल्यात. त्यातूनही सुमधूर ध्वनी ऐकू येतो.

प्रसिद्ध मंदिरातील या दगडात ऑर्थोक्लेज सारखी स्फटिक रचना असलेली खनिजे आहेत. या आवाजाचं संगिताचं रहस्य म्हणजे येथील व्यास आणि लांबीचा आकार यामुळे दगडांवर हात फिरवल्यास किंवा वजन पडल्यास त्यातून संगित येकू येतं. येथील खांब 15 व्या शतकात बांधले गेले होते.

येथील ग्रामस्त सांगतात की, पुर्वी विठ्ठलाला नैवेद्य अर्पण करताना या खांबांच्या संगीतावर नृत्य देखील केले जायचे.

मंदिराला भेट कशी द्याल?

तुम्ही मुंबईत किंवा महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर येथे भेट देण्यासाठी कर्नाटकमध्ये पोहचा तेथून बसच्या सहाय्याने तुम्ही हम्पी गाठू शकता. तेथून हे मंदिर १०० किलोमिटर अंतरावर आहे. त्यामुळे या मंदिराला भेट देण्यासाठी हम्पी येथून तुम्ही बाय रोड जाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT