Siddhi Hande
नाशिक शहरात खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नाशिकमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत.
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे खूप सुंदर आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराची हेमाडपंती स्थापत्यशैलीत पुनर्बांधणी करण्यात आली आहे.
रामकुंड हे गोदावरी नदीच्या पात्रात बांधण्यात आले आहे. वनवासात असताना प्रभू रामचंद्र या ठिकाणी स्थान करायचे, असे म्हटले जाते.
नाशिकमधील काळाराम मंदिर हे खूप जुने आहे. वनवासात असताना प्रभू राम या मंदिराच्या परिसरात वास्तव्यास होते.
पांडव लेणी ही जवळपास २००० वर्ष जूनी असल्याचे बोलले जात आहे. या लेणी पाली भाषेतूल अनेक शिलालेख आहेत.
नाशिकमधील पंचवटी हे गोदावरीच्या तीरावर वसलेले ठिकाण आहे. येथे अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येतात.