Malshej Ghat Tourism : निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; माळशेज घाटात जाल तर परत घरी यावं वाटणार नाही

Malshej Ghat Tourism News : माळशेज घाटात गेल्यावर येथे तुम्हाला खाण्यापिण्याची देखील चिंता नसेल. कारण घाट सुरु होण्याआधी काही दुकाने लागतात आणि हॉटेल्स देखील आहेत.
Malshej Ghat Tourism News
Malshej Ghat TourismSaam TV

पावसाळा सुरू झाला आहे. अशात आता प्रत्येक जण ट्रेकिंगचा प्लान करत आहेत. काही व्यक्तींना ट्रेकिंग आवडते तर काहींना पांढराशुभ्र ढगासारखा फेसाळणारा धबधबा आवडतो. आता तुम्हाला देखील धबधबा आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट जागा शोधली आहे.

Malshej Ghat Tourism News
Monsoons Tourism: पावसाळ्यात मुंबईत फिरायचं आहे? 'या' ठिकाणांना आवश्य भेट द्या

पुण्यातील माळशेज घाट

नागमोडी वळण आणि नंतर जणू काही ढगात गेलोय असा फिल देणारा माळशेज घाट हे एक पर्यटन स्थळ आहे. घाटात मोठे डोंगर आणि दरी आहेत. यातून संपूर्ण घटात अनेक ठिकाणी धबधबे वाहत आहेत. या पावसाळ्यात तुम्ही देखील येथे भेट देऊ शकता.

कसं जायचं

माळशेज घाटात पोहचायचे असेल तर तुम्हाला बाय रोड प्रवास करावा लागेल. त्यासाठी तुम्ही कल्याण, ठाणे आणि मुंबईहून प्रायव्हेट टॅक्सी करू शकता. किंवा येथे पोहचण्यासाठी तुम्ही बसचा देखील वापर करू शकता. जुन्नरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व बस माळशेज घाटातून जातात.

खाण्यासाठी सोय

माळशेज घाटात गेल्यावर येथे तुम्हाला खाण्यापिण्याची देखील चिंता नसेल. कारण घाट सुरु होण्याआधी काही दुकाने लागतात आणि हॉटेल्स देखील आहेत. तर घाट संपताना देखील काही हॉटेल लागतात. येथे तुम्ही चहा तसेच मिसळ पाववर ताव मारू शकता.

ही काळजी घ्या

माळशेज घाटात जात असाल तर स्वतःची नीट काळजी घ्या. कारण या घाटात अनेक नागमोडी वळणे आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काही आव्हाने येऊ शकतात. त्यामुळे सतर्कतेने येथे प्रवास करा. घाटात दरड कोसळण्याच्या देखील काही घटना घडतात त्यामुळे सावधान राहा आणि सुरक्षित प्रवास करा.

Malshej Ghat Tourism News
Wardha Tourism : कॅटरीना वाघीण बघायचीय? बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊया! कसं जाल आणि काय पाहाल?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com