Wardha Tourism : कॅटरीना वाघीण बघायचीय? बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊया! कसं जाल आणि काय पाहाल?

Bor Wildlife Sanctuary Tourist Places : अनेक पर्यटक बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. आता तुम्हाला देखील येथे यायचं असेल आणि कॅटरीना वाघीणीला पाहायचं असेल तर येथे पोहचायचं कसं, याची माहिती जाणून घेऊ.
Bor Wildlife Sanctuary Tourist Places
Wardha TourismSaam TV

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सध्या जंगल सफारीसाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे. बोर प्रकल्पाची बुकिंग सध्या फुल असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकल्पात विविध पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. सध्या या प्रकल्पतील कॅटरीना वाघीण ही सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे.

Bor Wildlife Sanctuary Tourist Places
Summer Tourism: उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी भारतातील हटके आणि स्वस्त ठिकाणे, घ्या जाणून

कधी एकटी तर कधी आपल्या तीन शावकांसह कॅटरीना वाघीण पर्यटकांना दिसत आहे. त्यामुळे जंगल सफारीसाठी येणाऱ्या कॅटरीनाची भुरळ सर्वांना पडल्याचं दिसत आहे. जंगलातील वन्यजीव पाहण्याची अनेकांची इच्छा असते. त्यामुळे अनेक पर्यटक या व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. आता तुम्हाला देखील येथे यायचं असेल आणि कॅटरीना वाघीणीला पाहायचं असेल तर येथे पोहचायचं कसं, याची माहिती जाणून घेऊ.

बोर व्याघ्र प्रकल्पात काय काय पाहायला मिळणार?

बोर व्याघ्र प्रकल्प नागपूरपासून 65 किमी आणि वर्धा जिल्हा मुख्यालयापासून 40 किमी अंतरावर आहे. येथे भेट दिल्यावर तुम्हाला जंगली प्राणी जसे वाघ, कोल्हे, अस्वल दिसतील. येथे हिंस्र प्राण्यांसह मोर देखील मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात. तसेच रंगिबेरंगी विविध जातीचे पक्षी देखील येथे आहेत.

बोर व्याघ्र प्रकल्पाकडे जाण्यासाठी मार्ग

बोर वन्यजीव अभयारण्याकरिता सर्वात जवळचे वर्धा हे रेल्वे स्टेशन आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांहून तुम्ही या स्थानकात येऊ शकता. वर्धापासून पुढे पर्यटकांना हिंगणीकडे जाण्यासाठी बाय रोड जावे लागते. येथे आल्यावर अभयारण्यसाठी पर्यटनासाठी कार किंवा जीपचा वापर तुम्ही करू शकता. रेल्वेने येताना बोर वन्यजीव अभयारण्यापासून बुटी बोरी रेल्वे स्टेशन (50.2 किमी) अंतरावर आहे. तुम्ही येथून देखील बोर वन्यजीव अभयारण्यात येऊ शकता.

Bor Wildlife Sanctuary Tourist Places
PMP Tourism : पुणेकरांसाठी खास पर्यटन बससेवा सुरु; 'हे' नियम पाळल्यास मोफत फिरता येणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com