PMP Tourism : पुणेकरांसाठी खास पर्यटन बससेवा सुरु; 'हे' नियम पाळल्यास मोफत फिरता येणार

PMP Tourism Bus Service : प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही सेवा सुरु राहणार आहे. १ मेपासून पर्यटकांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
PMP Tourism Bus Service
PMP TourismSaam TV

सध्या सर्व शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे शनिवार आणि रवीवार पाहून नागरीक आपल्या मुलांसह घराबाहेर पडतात. अशा पर्यटन प्रेमींसाठी पीएमपीकडून विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील सर्व धार्मिक तसेच पर्यटनस्थळी भेट दिली जाणार आहे.

PMP Tourism Bus Service
Satara Tourism: मुनावळे येथे महिन्याभरात सुरु होणार वॉटर स्पोर्टस, सातारा पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटीची मान्यता

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने पुणे दर्शन बससेवा सुरु करण्यात आलीये. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही सेवा सुरु राहणार आहे. १ मेपासून पर्यटकांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. याला प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी विविध कार्यालय, कॉलेज,शाळा यासह औद्योगिक व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असल्याने या दिवशी पर्यटनाला घराबाहेर पडणाऱ्याची संख्या जास्त असते. त्यांचा प्रवास आरामदायी सुलभ व माफक दरात होण्यासाठी सेवा सुरू केली आहे.

तिकीट दरात १०० टक्के सवलत

प्रवाशांनी जर ग्रुपमध्ये तिकीट काढलं तर त्यांना सवलत आहे. यासाठी किमान ५ व्यक्तींचा ग्रुप असावा. ५ जणांच्या तिकीटावर १०० टक्के सुट दिली जात आहे. तसेच बसमधून फिरत असताना प्रवाशांना सर्व माहिती निट समजावी यासाठी बसमध्ये एक गाइड देखील देण्यात येणार आहे.

PMP Tourism Bus Service
Latur City Bus Service: लातूरची शहर बससेवा आठ दिवसांपासून बंद; महापालिकेकडे बिल थकल्याने निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com